Dombivali News : स्कुटरच्या इंजिन मध्ये घुसला साप; डोंबिवलीच्या ऋषिकेशने दिले जीवनदान

पावसाळ्यात बिळात पाणी जमा झाल्याने बरेचसे साप हे मानवी वस्तीत भरकटून येतात. ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात येतात.
Ghonas Snake
Ghonas SnakeSakal
Updated on

डोंबिवली - पावसाळ्यात बिळात पाणी जमा झाल्याने बरेचसे साप हे मानवी वस्तीत भरकटून येतात. ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात येतात. असाच एक साप चक्क स्कुटरच्या इंजिनमध्ये जाऊन बसला. सापाची हालचाल लक्षात आल्याने चालकाने पॉज संस्थेला फोन केला.

पॉज संस्थेचे स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे ह्यांनी घटनास्थळी धाव घेत ह्या सापाला स्कुटर मधून सुखरुप रित्या बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर त्या सापाला सुखरूपरीत्या निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

हा 1 फुटाचा डुरक्या घोंणस जातीचा पूर्णपणे बिन विषारी साप असून तो खूप सुस्त असतो आणि ठाणे जिल्ह्यात ह्याचं वास्तव्य नेहमीच असते. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असून मानवाला ह्याचा धोका नसतो असे पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले.

दरवर्षी पॉज संस्था ही शेकडो वन्यजीवांच्या मदतीला धावून जाते आणि गेल्या 24 वर्षांत संस्थेने हजारो वन्यजीव पुनर्वसित केले आहेत. संस्थेच्या 9820161114 ह्या हेल्पलाईन वर कॉल करू शकता असे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.