पिकनिक बेतली जिवावर; डोंबिवलीतील दोघांचा नदीत बुडून मृत्यू

डोंबिवलीतील नामांकित कॉलेज मधील 12 जणांचा ग्रुप सोमवारी दुपारी मलंगगड परिसरात पिकनिकला आला होता.
death
deathSakal
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्व भागातील अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावाजवळील मलंगगड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतील 2 तरुणांचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. अंकित जैस्वाल (वय 17) आणि निखिल कनोजिया (वय 17) अशी दोघांची नाव असून दोघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहेत.

डोंबिवलीतील नामांकित कॉलेज मधील 12 जणांचा ग्रुप सोमवारी दुपारी मलंगगड परिसरात पिकनिकला आला होता. आंभे गावा जवळील मलंगगड नदीत काही तरुण दुपारी 2 च्या सुमारास पोहण्यासाठी उतरले. पावसाची संततधार सुरू असल्याने सायंकाळी 5 च्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एका तरुण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी अंकित व निखिल गेले. पाण्याचा प्रवाह वाढून अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

death
Viral Video : गाडीचा हॉर्न वाजला, नागोबा डुलायला लागले! एक मोरही; 'त्या' ऐतिहासिक व्हिडिओची वर्षपूर्ती

स्थानिक गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांचा शोध सुरू केला. हिललाईन पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. ते उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

मागील वर्षी मलंगगड भागात नदीत बुडून 6 जनांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कुशिवली आणि खरड गावात प्रत्येकी 1 तर नेवाळी व चिंचवली गावात प्रत्येकी 2 जनांचा बुडून मृत्यू झाला होता. अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर तहसीलदारांनी 31ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. मनाई आदेश असतानाही येथे पिकनिकसाठी हे तरुण कसे आले याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.