डोंबिवली पश्चिमेतील भाजपाचे गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या खाजगी कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपाध्याय हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेला जुगल यांचे खासगी कार्यालय आहे. ते भाजपाचे गुजराती सेलचे पदाधिकारी व सोशल मीडियाचे संयोजक आहेत. गुरुवारी सकाळी काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या कार्यालयात घुसल्या. जुगल यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकत कार्यालयाची नासधूस करायचा प्रयत्न केला.