Dombivli Assembly Election 2024 : सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचा मतदारसंघ; विरोधकांना द्यावी लागणार कडवी झुंझ

Ravindra Chavhan: भाजपच्या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असली तरी त्यांना कडवी झुंज येथे द्यावी लागणार आहे.
Dombivli Assembly Election 2024
Dombivli Assembly Electionesakal
Updated on

Uddhav Thackeray Latest News: डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून सलग तीनवेळा येथून मंत्री रविंद्र चव्हाण हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवली शहराची जनसंघापासून ओळख राहीली आहे. या मतदारसंघात बहुभाषिक लोक रहात असल्याने त्यांचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होत आले आहे.

या मतांच्या जोरावर भाजप मधून आमदार चव्हाण यांनी सलग तीन वेळा विजय प्राप्त केला. २०२४ च्या निवडणूकीत भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचे लक्ष चव्हाण यांचे असले तरी शिवसेना ठाकरे गटाचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर यंदा असणार आहे. भाजपच्या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असली तरी त्यांना कडवी झुंज येथे द्यावी लागणार आहे.

भाजपने त्यांना यंदा पुन्हा उमेदवारी दिली असून भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचे लक्ष त्यांच्यापुढे आहे. त्यांच्या या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाकडून येथे चव्हाण यांच्याविरोधात उमेदवार उभा केला जाऊ शकतो त्यामुळे येथे भाजपपुढे शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे.

Dombivli Assembly Election 2024
विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी ३५ जागा लढविणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.