Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

Dombivli Blast: जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाईही जाहीर केली आहे.
Dombivli Blast
Dombivli Blastesakal
Updated on

Dombivli Blast:  महाराष्ट्रातील डोंबिवलीतील एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात ही घटना घडली. पोलिसांनी कारखानदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  गुरुवारी दुपारी 1.40 वाजता अमुदान केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटल्यामुळे हा स्फोट झाला. घटनास्थळावरून आतापर्यंत 11 मृतदेह सापडले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही जणांचे मृतदेह ओळखू देखील येत नाही आहेत. अनेकांच्या मृतदेहांचे अवयव गोळा करण्याचे काम एनडीआरफ टीम करत आहे. दरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे.

पालघर येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणारा मानपाडा येथील रहिवासी असलेला अमित खानविलकर (42) सुट्टीमुळे घरीच होता. त्याने दुपारी स्फोट झाल्याचा आवाज ऐकला. तेव्हा तो घाबरला कारण त्याची पत्नी रिद्धी अमित खानविलकर (36) तिथे एका कंपनीत काम करत होती. त्याने पत्नीला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना माहिती दिली. तोपर्यंत अमुदान कंपनीत स्फोट झाल्याची घटना सर्वत्र पसरली होती.

Dombivli Blast
Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

अमितने आपल्या पत्नीचा फोटो व्हाट्सअप गृपवर शेअर केला. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मित्रांना देखील फोटो पाठवला. त्यानंतर अमित महाडी नावाच्या मित्राला एका डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी दोन हॉस्पीटलमध्ये चौकशी करण्याचे सांगितले. जिथे जखमींना नेण्यात येत होतं. दोन महिलांसह चार मृतदेह डोंबिवली (पश्चिम) येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.

अमित महाडी मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि दोन महिलांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे जळालेले आढळले. त्यानंतर त्यांनी अमित खानविलकर यांना रुग्णालयात भेट देऊन तपासणी करण्यास सांगितले. यावेळी खानविलकरला धक्का बसला. कारण त्याने रिद्धीला सोन्याच्या अंगठीवरून ओळखले होते.

अमित आणि रिद्धीला 12 वर्षाचा मुलगा आहे. तीन महिन्यापूर्वी ती अमुदान कंपनीत अकाऊंट विभागात जाईन झाली होती. मात्र या घटनेने आमचं जीवन उद्ध्वस्त केल्याचे अमितने सांगितले. मुलगा सुट्टी असल्यामुळे काकाच्या घरी आहेत. त्याला अजून सांगितलं नाही.

रिद्धीची सहकारी रोहिणी कदम (26) हिचाही या घटनेत मृत्यू झाला. डोंबिवली (पूर्व) येथील आजदे गाव परिसरात ती मोठा भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होती. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

Dombivli Blast
Dombivli MIDC Blast: एमआयडीसीत अजूनही कामगार अडकलेत, बचावमोहीम सुरू, नातेवाईकांचा आक्रोश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.