डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची दुरावस्था असो की शहरभर पसरलेला कचरा...कल्याण डोंबिवलीकर फक्त सोशल मीडियावर आवाज उठविताना दिसतात.
इतर शहरातून आलेले राजकीय नेते, कलाकारांनी कल्याण डोंबिवलीच्या दुरावस्थेवरून येथील जनता गप्प कशी अशी टिप्पणी देखील केली, मात्र तरीही जनता मूग गिळून गप्प आहे. समाजाच्या या भूमिकेवर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विवेक पंडित यांनी प्रकाश टाकला आहे.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, जिथे संवेदना, प्रतिकार, विरोध नाही, अश्या गोष्टी, व्यावहारिकदृष्ट्या, 'मृत' मानाव्यात !! यामुळे आता डोंबिवली शहर मृत घोषित होणार ? असा संदेश देणारा फलक शाळेच्या बसवर लावण्यात आला असून हा फलक लक्ष वेधत आहे.
याआधीही पंडित यांनी समाजाचे कान उघडणारे चॅनेल फलक बसवर लावले आहेत. कल्याण डोंबिवलीकरांना कधी जाग येते हे पहावे लागेल.
शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नियमित फटका शालेय विद्यार्थ्यांना बसतो. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्नांना विद्या निकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित हे वारंवार वाचा फोडत असतात.
शाळेच्या बसवर तसे संदेश देणारे फलक ते लावत असतात स्वातंत्र्याचा अमूर्त मोहोत्सव निमित्त त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात निस्वार्थी लोकप्रतिनिधी कधी मिळतील ? जनतेच्या समस्या तत्परतेने दूर करणारे प्रशासन कधी मिळेल ? जनता आपले हक्क आणि जबाबदाऱ्या ओळखून कधी वागेल असा सवाल जनतेला करत त्यांनी सुराज्याची पहिली पहाट कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर कोरोना काळात प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू होता. प्रशासनाने सांगायचं तसे नागरिकांनी वागायचे. लोकशाहीचा मूळ आधार जनता आहे, मात्र त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतले जात नाहीत.
म्हणूनच मार्च 2020 पासून लोकशाही हरवली आहे अशी टिका करत फलक लावले होते. तसेच 'डोंबिवली एक सोशिक शहर' आणि 'आठवण शाळा बंद आहेत' असे संदेश देणारे फलक बसवर लावत प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी आपल्या लेखणीतून विरोध दर्शविला होता.
पुन्हा एकदा शाळेच्या बसवरील फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण केवळ संदेश वाचुन, एखाद्या समस्येवर समाज माध्यमावर बोलून नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता पंडित यांनी डोंबिवली शहर मृत घोषित होणार ? अशी टिका जनतेच्या वर्तनावर केली आहे. यामुळे आता तरी या संदेशामागील मतीतार्थ समजून घेत जनतेला जाग येते का याची वाट पहिली जात आहे.
काय आहे संदेश
Breaking News
Breaking News
डोंबिवली शहर, ' मृत' घोषित होणार ?
समाजशास्त्रज्ञांच्या मते, जिथे संवेदना, प्रतिकार, विरोध नाही, अश्या गोष्टी, व्यावहारिकदृष्ट्या, 'मृत' मानाव्यात !!
जागतिक स्तरावरील, सर्वात सहनशील वसाहत असल्यामुळे, गावभर पसरलेला कचरा, हरवलेले फूटपाथ, सार्वत्रिक मुक्त बाजारपेठ, निष्काम कर्मयोगावर विश्वास असणारे बरेचसे लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय उदासीनतेचे नवीन मापदंड ह्यांचा दैनंदिन अनुभव घेणारा ' सच्चा डोंबिवलीकर ', ठेविले KDMC, तैसेचि रहावे' चा जप करत अलिप्तपणाच्या समाधीकडे जाताना म्हणत आहे,
'यदा यदा हि समास्यायाः, ग्लानिर्भवति प्रशासन: ।
अभ्युत्थानाय नागरिकाणां संभवामि पंच वर्षे ||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.