Dombivli : खासदारांच्या गाडीतून फिरताना गळचेपी दिसली नाही का ?

शिवसेना शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांचा आमदार गायकवाड यांना परखड सवाल
mumbai news
mumbai news sakal
Updated on

डोंबिवली - शिंदे पिता पुत्र भाजप पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करत असल्याचा खळबळजनक आरोप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. यावर शिवसेना शिंदे गटाचे युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी आमदार गायकवाड यांना खासदारांच्या गाडीत बसून भूमिपूजन कार्यक्रम करत फिरत होते तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का ?

वक्तव्य करताना आपण कुठलं वक्तव्य कतोय याचे तारतम्य बाळगले पाहिजे असा परखड सवाल केला आहे. यामुळे कल्याण मधील भाजप शिंदे गट वाद आता डोंबिवली पश्चिमेला पोहोचला असून पुढे हा कोणते वळण घेतो पहावे लागेल.

भाजप नेत्यांनी महापौर आमचाच बसेल असा दावा केल्यानंतर मनसे आमदारांनी भाजप शिंदे यांच्या सांगण्यावरून चालतं. हे काय महापौर बसवणार यांनी आधी मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसवून दाखवावा असे म्हणत डिवचले होते.

mumbai news
Mumbai Crime : धक्कादायक! मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

यावर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची रि ओढत शिंदे पिता पुत्रांकडून भाजप पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण केलं जातं आहे असा खळबळजनक आरोप केला. यावर आता आमदार गायकवाड यांना शिंदे गटाने उत्तर देऊ केले आहे.

mumbai news
Mumbai Crime : धक्कादायक! मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी भाजप नेत्यांना सल्ला दिलाय. म्हात्रे यांनी बोलताना काही लोकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसेल असं स्टेटमेंट केलंय..शिवसेना-भाजप अनेक वर्षांपासून युतीमध्ये आहे,राज्यामध्ये देखील युतीचं सरकार आहे. प्रत्येक माणसाने वक्तव्य करताना आपण कुठलं वक्तव्य कतोय याचे तारतम्य बाळगले पाहिजे असा सल्ला दिला.

पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेत. एवढी वर्ष या शहरांमध्ये कामं होत नव्हते मात्र खासदार श्रीकांत शिंदे आल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम होतायत. एक सुशिक्षित राजकारणी आम्हाला मिळालाय असं बोलतायत. शिवसेना म्हणून लोकांसमोर विकासाचा दृष्टिकोन घेऊन जाणार आहे.

mumbai news
Mumbai Police Viral Post : गांजा हवाय का? डिलिव्हरी बॉयची ऑफर; तक्रारीनंतर पोलिसांच्या तत्परतेचे होतंय कौतुक

आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. येणाऱ्या काळात जनता ठरवेल या शहरांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसेल, कोणाचा महापौर बसेल. राजकारण्यांनी याच्यावर चर्चा न केलेले बरे,आपण आपलं काम घेऊन लोकांपर्यत गेलं पाहिजे असे सांगितले.

तसेच हीच लोक काही दिवसापूर्वी खासदारांच्याच गाडीत बसून भूमिपूजन करत होते. कल्याण पूर्वेत खासदार यांना घेऊन फिरत होते. तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का ? असा सवाल करत सगळ्यांनी अशी वक्तव्य आता बंद करायला पाहिजे असे म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.