Mumbai : आरपीएफची अश्रु धुराची टेस्ट

नागरिकांच्या डोळ्यातून काढले पाणी
Dombivli East Indiranagar slum area citizen eye test
Dombivli East Indiranagar slum area citizen eye test
Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना शुक्रवारी सायंकाळी अचानक डोळे चुरचुरणे चा त्रास जाणवू लागला. प्रदूषणामुळे त्रास होत असल्याचे नागरिकांना प्रथम वाटल्याने त्यांनी त्वरित डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र शेजारीच असलेल्या आरपीएफ कॅम्प मध्ये अश्रूधुराची तपासणी करण्यात आली. हवेमुळे हा धूर नागरी वस्तीत आल्याने नागरिकांना त्रास झाला. मात्र तो त्रासदायक नसल्याची माहिती यावेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

पूर्वेतील शेलार नाका परिसरात सायंकाळी 6.30 च्या आसपास नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास जाणवू लागले. डोंबिवली एमआयडीसी मधील प्रदूषणामुळे अनेकदा नागरिकांना असे त्रास होत असल्याने प्रदूषण मुळे हा त्रास होत असल्याचा समज स्थानिक नागरिकांचा झाला. लहान मुलांना देखील त्रास होत असल्याने नागरिकांनी घराची खिडक्या दारे बंद करून घेतली. ज्यांना त्रास जास्त जाणवत होता त्यांनी लगेच डॉक्टर देखील गाठला.

रामनगर पोलिसांनी याची माहिती मिळताच पोलिसांनी माहिती घेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर म्हणाले, की या वस्ती शेजारी आरपीएफ बटालियन आहे. त्याठिकाणी प्रशिक्षण सुरू असतानाच अश्रूधुराची तपासणी घेण्यात येत होती. जमिनीवर त्यांनी दोन कांड्या फोडल्या होत्या. मात्र हवा असल्याने त्याची काही मात्रा हवेत पसरून त्याचा बाजूच्या वस्तीतील नागरीकांना काही प्रमाणात त्रास झाला मात्र तो धोकादायक नाही असे सांगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर म्हणाले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.