Latest Dombivli News: देशाच्या सीमेवर तैनात जवानांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत डोंबिवलीकरांना एक राखी जवानांसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास डोंबिवलीकर भगिनींनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत हजारो राख्या सीमेवरील बंधूंसाठी जमा केल्या आहेत. भारत मातेच्या जयघोषात जवानांसाठी प्रार्थना करत या राख्या भूजसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.
एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था, श्री मुद्रा कलानिकेतन आणि भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधत एक राखी जवानांसाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जवानांसाठी एक राखी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास केवळ डोंबिवलीकरांनीच नाही तर ठाणे व मुलूंड येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी देखील प्रतिसाद देत जवानांसाठी राख्या पाठविल्या आहेत. हजाराहून अधिक राख्या जवानांसाठी आल्या आहेत.
येत्या 15 ऑगस्ट ला लाडक्या बहिणींनी भावासाठी पाठविलेल्या या राख्या वीर जवानांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. तसेच तेथील जवानांना गस्त घालण्यासाठी 10 ई रिक्षा प्रदान करण्यात येणार असल्याचे मंदार हळबे यांनी सांगितले. यावेळी एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था आणि श्री मुद्रा कलानिकेतनच्या विद्यार्थीनी आपली नृत्यकला सादर करुन देशभक्ती आणि रक्षाबंधनवर आधारित नृत्याचा कलाविष्कार दाखवणार असल्याची माहिती वृषाली दाबके व सुनिला पोतदार यांनी दिली. द्यार्थीनी आपली नृत्यकला सादर करुन देशभक्ती आणि रक्षाबंधनवर आधारित नृत्याचा कलाविष्कार दाखवणार असल्याची माहिती डॉ. वृषाली दाबके व सुनिला पोतदार यांनी दिली.
ऐश्वर्या निमकर यांनी तर जवानांसाठी खास एक पत्र लिहिले असून त्या म्हणाल्या, माझा भाऊ गेले अनेक वर्षे सीमेपार राहण्यासाठी आहे. विविध कारणांमुळे त्याच्यापर्यंत वेळेत राखी पोहोचत नाही, त्याची सल कायम मनात होती. यंदा सीमेवरील भावासाठी राखी पाठविण्याचा योग आला. आणि वेळेच्या आधी आपल्या भावाजवळ राखी पाठविली जाणार असल्याने एक वेगळीच भावना मनात दाटून आली.
ती शब्दांत व्यक्त करणे सोप्पे नाही, परंतू लिखाणातून ती मांडून सीमेवरील भावापर्यंत ती पोहोचणार आहे याचा आनंद असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तर मुलुंडच्या केळकर कॉलेजच्या काव्या व्यंकट चेलम या विद्यार्थीनीने सांगितले की या उपक्रमाची माहिती मी महाविद्यालयात सांगताच आमच्या शिक्षकांसह विद्यार्थीनींने खास मुलुंड हून भारतीय जवानांसाठी राख्या पाठवल्या आहेत. तेथे आम्ही आमची कला देखील सादर करणार असून ही संधी मला मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.