Dombivli Blast Update : नोकरी सोडणार होती पण..., डोंबिवलीतील दुर्घटनेत रोहिणी कदमच्या मृत्यूने परिसरात हळहळ

Dombivli Blast Latest News : कंपनीच्या ठिकाणी असुविधा असल्याने तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मैत्रिणीला दुसरीकडे नोकरी असेल तर सांग असे दोन दिवसांपूर्वी सांगितले पण...
Dombivli Blast Update : नोकरी सोडणार होती पण..., डोंबिवलीतील दुर्घटनेत रोहिणी कदमच्या मृत्यूने परिसरात हळहळ
Updated on

डोंबिवली : कंपनीच्या ठिकाणी असुविधा असल्याने तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मैत्रिणीला दुसरीकडे नोकरी असेल तर सांग असे दोन दिवसांपूर्वी सांगितले आणि त्याआधीच नियतीने घात केला. डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या दुर्घटनेत रोहिणी कदम (वय 25) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहिणी हिच्या मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती आली आहे. अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. एनडीआरएफ पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

या दुर्घटनेत मूळची कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला येथील रोहिणी कदम या 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे कदम कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहिणी हिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती या कंपनीत जॉब करत होती. परंतु येथील असुविधेमूळे ती कंटाळली होती. मैत्रिणीला तिने या कंपनीत एक दिवस स्फोट होईल बघ असे भाकीत देखील केले होते. नोकरीला कंटाळलेल्या रोहिणीने मैत्रिणीला दुसरा जॉब पाहण्यास सांगितले होते. मात्र त्या आधीच गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत रोहिणीचा हाकणाक बळी गेला आहे.

त्या दिवशी रोहिणीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी ती नक्कीच अधिक आनंदात होती. मात्र या दुर्घटनेने तीला जीव गमवावा लागला आहे. आपल्या घरातील हसती खेळती रोहिणी गमावल्याने मोठे दुःख कदम कुटुंबाच्या वाट्याला आले आहे.

Dombivli Blast Update : नोकरी सोडणार होती पण..., डोंबिवलीतील दुर्घटनेत रोहिणी कदमच्या मृत्यूने परिसरात हळहळ
Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

मूळचे कोकणातील असलेले कदम कुटुंब गेले अनेक वर्ष डोंबिवली येथे नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक आहे. नुकताच या कुटुंबाने पाण्याची अडचण लक्षात घेऊन वास्तव्यासाठी नवीन जागी स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला होता. येत्या रविवारी हा गृहप्रवेश होणार होता मात्र या सगळ्या आनंदावर आता निष्ठूर नियतीने विरजण घातले आहे. रोहिणीच्या वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे अशी माहिती कदम कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली.

या धक्कादायक दुर्घटनेत कामगारांचे मृतदेह जळाले असून छिन्न विच्छिन्न झाले आहेत. शुक्रवारी काही मृतदेहाचे तुटलेले अवयव रेस्क्यू टीम गोळा करत आहे. हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत आहे. मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटवणे मोठ आव्हान आहे. रोहिणीचा मृतदेह हा केवळ दाताला लावण्यात आलेल्या तारेमुळे ओळखता आला.

Dombivli Blast Update : नोकरी सोडणार होती पण..., डोंबिवलीतील दुर्घटनेत रोहिणी कदमच्या मृत्यूने परिसरात हळहळ
Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट प्रकरणात अमूदान कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.