Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोट प्रकरणात पहिली कारवाई; कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक

Dombivli MIDC Blast : डोबिंवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणात आता अटक करण्यात आली आहे.
Dombivli MIDC Blast first action from authorities
Dombivli MIDC Blast first action from authoritieseSakal
Updated on

डोबिंवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. या भीषण स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.(dombivli midc blast main accused malti mehta arrested by nashik police in explosion toll death 11 many injured )

डोंबिवलीत झालेल्या स्फोटानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पहिली अटक देखील करण्यात आली आहे. अमुदान कंपनीच्या स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.काल(गुरूवारी) रात्री नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पध्दतीने कारवाई करत मालती मेहता यांना अटक केली आहे.

Dombivli MIDC Blast first action from authorities
Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

स्फोटानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेचे लोकेशन ट्रेस केलं आणि शोध घेतला. आरोपीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डोंबिवलीतील स्फोटानंतर मुख्य आरोपी मालची मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता.

पोलिसांच्या टीमने त्यांनी अटक केली आहे. नाशिकमधीन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलं. त्यानंतर इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना मुंबईला रवाना करण्यात येणार आहे.

Dombivli MIDC Blast first action from authorities
Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट प्रकरणात अमूदान कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

मृतांचा आकडा 11 वर

डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढला आहे. आज सकाळी बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकूण मृतांची संख्या अकरा झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अद्याप घटनास्थळी शोध मोहीम सुरु आहे.

गुरुवारी अमुदान या केमिकल कंपनीत आग लागली. बॉईलरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातं. आग इतर कंपन्यांमध्ये देखील पसरली. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजुच्या रहिवाशी इमारतीच्या काचा देखील फुडल्या. तीन ते चार किलोमीटर अंतरावर स्फोटामुळे हादरा जाणवला होता. यावरुन स्फोटाची तीव्रता समजू शकेल.

Dombivli MIDC Blast first action from authorities
Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDCला आहे भीषण स्फोटांचा मोठा इतिहास, याआधी कधी-कधी झालेले भीषण ब्लास्ट? वाचा Timeline

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.