Dombivli MIDC Blast : डोंबिवली दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात स्थापन केला मदत कक्ष

डोंबिवली एमआयडीसी येथील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाल्याने आजूबाजूच्या कंपन्या देखील जळून बेचिराख झाल्या आहेत.
Dombivli MIDC
Dombivli MIDCEsakal
Updated on

डोंबिवली, ता. 24 - डोंबिवलीत एमआयडीसी येथील रासायनिक कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे आजुबाजुच्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असून परीसरातील कोणी बेपत्ता नागरिक असतील किंवा इतर मदतीसाठी महापालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी 0251-2481073/2495338 या दूरध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

डोंबिवली एमआयडीसी येथील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाल्याने आजूबाजूच्या कंपन्या देखील जळून बेचिराख झाल्या आहेत. 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. कुलिंगचे काम अजूनही येथे सुरू आहे.

महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या. सदर आपत्तीच्या नियंत्रण व मदत कार्यात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागाच्या सहकार्याने सहभागी झाली. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या आणि अन्य अग्निशमन विभागाच्या अशा एकूण बारा गाड्यांच्या मदतीने, त्याचप्रमाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत काल दिवसभरात 52 पाण्याचे टँकर घटना स्थळी पाठवून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

Dombivli MIDC
Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोट प्रकरणात पहिली कारवाई; कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक

दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात आणि महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालपासून एकूण 68 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते, पैकी 42 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजही 26 रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी 12 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यत दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता 9 झाली आहे.

आजही प्रत्यक्ष घटना स्थळावर पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम व शोधकार्य सुरु आहे. तसेच एमआयडीसीतील अंतर्गत पोहोच रस्ते, घटना स्थळी जाणारे रस्ते साफसफाई करण्याचे काम सुरु असून, दुर्घटना स्थळावरुन गोळा केलेला घनकचरा (Solid Waste) हा पुढील प्रक्रीयेसाठी तळोजा येथे पाठविला जाणार आहे

Dombivli MIDC
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी दुर्घटनेला २४ तास उलटले, तरी भावाचा शोध लागेना...; कुटुंबियांचा जीव टांगणीला

सदर दुर्घटना घडलेल्या परीसरातील नागरीकांपैकी कोणी बेपत्ता असेल किंवा इतर मदतीसाठी महापालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 0251-2481073/2495338 हे आहेत.

या आगीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्य शासनाचे महसुल विभाग व महापालिका यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.