Mumbai : डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता लालेलाल; रस्त्यावर केमिकल मिश्रीत सांडपाणी

औद्योगिक परिसरातील प्रदुषणाकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ लक्ष देणार का असा सवाल
Dombivli MIDC Chemical mixed sewage on road pollution health issue
Dombivli MIDC Chemical mixed sewage on road pollution health issuesakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली औद्योगिक विभागातील रासायनिक प्रदुषणाची समस्या गेले कित्येक वर्षापासून भेडसावत आहे. ्त्यातच सोमवारी रात्री एमआयडीसी फेज 2 मधील रस्ता हा केमिकल मिश्रित सांडपाण्याने लालेलाल झाल्याचे पहायला मिळाले. या परिसरातील रासायनिक कपंन्यांमधील सांडपाण्यावर योग्य पद्धतीने प्रक्रीया न करता ते सांडपाणी नाल्यात सोडले जाते.

येथील नाले ही स्वच्छ नसल्याने अनेकदा हे सांडपाणी रस्त्यावर येऊन त्याची दुर्गंधी परिसरात सुटते. तसेच हवेशी संपर्क आल्याने त्याला वेगवेगळे रंग प्राप्त होऊन रस्ते देखील त्याच रंगात न्हाऊन गेल्याचे दिसून येते. औद्योगिक परिसरातील प्रदुषणाकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ लक्ष देणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून प्रक्रीया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जाते. रसायनांच्या उग्र दर्प मुळे परिसरात दुर्गंधी सुटते. त्याचबरोबर नागरिकांना श्वसनाचा त्रास, मळमळणे, उलट्या, चक्कर येणे असे शारीरीक त्रास देखील जाणवतात. अनेकदा हे सांडपाणी नाल्यात योग्य पद्धतीने सोडले, नाल्याच पाण्याचा निचरा न झाल्यास ते रसायन मिश्रित पाणी रस्त्यावर साचते.

Dombivli MIDC Chemical mixed sewage on road pollution health issue
Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

किंवा रस्त्यावर गटारातील पाणी साचलेले असते, त्यात कारखान्यातील माल स्थलांतरीत करताना काही रासायनिक पदार्थ सांडतात त्यांचा हवेशी, पाण्याशी संपर्क आल्यास त्यांतून दुर्गंधी युक्त वायू हवेत पसरतो. यामुळे या परिसरातील नागरिक, कामगार यांना अनेक त्रासांचा सामना देखील करावा लागला आहे. सोमवारी सायंकाळी देखील अशाच पद्धतीने फेज 2 मध्ये एका नाल्यालगत असलेल्या रस्त्यावर केमिकल मिश्रीत सांडपाणी रस्त्यावर साचले आहे.

Dombivli MIDC Chemical mixed sewage on road pollution health issue
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

या पाण्याला लाल रंग प्राप्त झाल्याने रस्ता देखील लाले लाल झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून त्याच्या जवळ गेल्यास उर्ग दर्पाने डोळे चुरचुरणे असे प्रकार घडत आहेत. हे पाणी पुर्णपणे रस्त्यावर साचले असून त्यातून वाहन चालक आपली वाहने नेत असल्याने ते आणखी पसरत आहे. तसेच या पाण्याला पूर्णतः फेस देखील आला होता.

या पाण्यामुळे परिसरात उग्र वास सुटला असून डोळे चुरचुणे, मळमळणे यांसारखे त्रास नागरिकांना होत असल्याने स्थानिकांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसी परिसरात या घटना वारंवार घडत असून प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रशासन याकडे गांर्भियाने लक्ष देणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()