Mumbai News : डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा केमिकल मिश्रित सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो
Dombivli MIDC chemical mixed sewage water on road health of citizens danger mumbai
Dombivli MIDC chemical mixed sewage water on road health of citizens danger mumbaisakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी पुन्हा एकदा केमिकल मिश्रित सांडपाणी रस्त्यावर आले असून रस्त्याला लालसर गुलाबी रंग आला आहे. रासायनिक कंपन्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेम्बर मधून लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातवरण पसरले असून या पाण्याला दुर्गंधी पसरली आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यातून बाहेर पडत पावसाच्या पाण्यात मिसळत आहे.

Dombivli MIDC chemical mixed sewage water on road health of citizens danger mumbai
Mumbai Local : भरधाव लोकलमध्ये मुंबईकरांना लटकत करावा लागतोय प्रवास; थरारक Video Viral

यामुळे या पाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिक संतापले आहेत. एमआयडीसीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाईप लाईनचे काम सुरु आहे.

मात्र कंपन्यापासून सांडपाणी प्रकल्पा पर्यत हे सांडपाणी वाहन नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी डेब्रिजच्या गोणी, प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने, प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुंबतात.

या नाल्याची सफाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे मात्र यंदा एमआयडीसीकडून ही नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच टाटा पॉवर कडून खंबाळपाडाकडे जाणार्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेम्बर्स मधून रस्त्यावरून वाहत आहे .

Dombivli MIDC chemical mixed sewage water on road health of citizens danger mumbai
Mumbai : पंधरा दिवसांपूर्वी वॉचमन कामावर आला अन् दुकान साफ करून गेला; 6 किलोचे दागिने लंपास

या लाल रंगाच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे एमआयडीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाउस, गुलाबी रस्ता हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदुषणाचा विळखा असल्याचे उघड झालेले असतानाच आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदुषणातून मुक्तता करण्यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.