Dombivli News : महावितरण कर्मचाऱ्यांना डोंबिवलीत मारहाण दोघांविरोधात गुन्हा दाखल

वरिष्ठांच्या सूचनेनुसार अमोल व त्यांचे सहकारी आकाश गायकवाड हे बुधवारी दुपारी देसाई यांच्या घरी गेले
dombivali
dombivali sakal
Updated on

डोंबिवली - वीज बिल वसुली करण्यास गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यास दोघा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेला घडली आहे. याप्रकरणी महावितरणचे जुनी डोंबिवली शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे यांच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिस ठाण्यात तेजस शिर्के व शुभम शिर्के यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जुनी डोंबिवली परिसरातील खंडोबा मंदिरा जवळ राहणारे वीज ग्राहक पी. एस. देसाई यांच्या नावे वीज मीटर आहे. या वीज मीटरचा वापर करणाऱ्या रहिवाशांकडे वीज देयकाची थकबाकी होती. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे यांनी यापूर्वी थकबाकीदार वीज ग्राहकास मोबाईलवर लघु संदेश पाठवून देयक भरण्यासंबंधी कळविले होते.

त्यावेळी त्यांनी ही रक्कम तात्काळ भरतो असे महावितरण कर्मचाऱ्यांना कळविले होते. आश्वासन देऊनही संबंधित थकबाकीदार देयक भरणा करत नव्हता. वरिष्ठांनी संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन वीज देयक भरण्याची सूचना करावी आणि रक्कम भरणा केली नाहीतर वीज पुरवठा खंडित करुन वीज मीटर काढून आणण्याची सूचना अमोल यांना केली होती.

dombivali
Mumbai News : मुंबई पोलिसांवर हल्ला करणारा आफ्रिदी अटकेत

वरिष्ठांच्या सूचनेनुसार अमोल व त्यांचे सहकारी आकाश गायकवाड हे बुधवारी दुपारी देसाई यांच्या घरी गेले. त्या घरात तेजस व शुभम रहात असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांस समजले. अमोल यांनी तेजसला वीज देयक भरण्यास सांगितले.

dombivali
Mumbai Accident : भरधाव ट्रकने टेम्पोला दिली धडक ; चालकाचा जागीच मृत्यू !

त्यावेळी तेजसने देयक भरणार नाही, असे ओरडून कर्मचाऱ्याला सांगितले. तेजस देयक भरणा करत नसल्याने अमोल, आकाश यांनी कारवाई करत घराचा वीज मीटर काढून घेतला. त्याचा राग तेजसला आला. त्याने महावितरण कर्मचाऱ्यांना अडवून तुम्ही मीटर का काढला,

dombivali
Pune News : राज्यातील आयटीआयचे विद्यार्थी धावणार ‘रन फॉर स्किल’ स्पर्धेत

असे दरडावून विचारले. तेवढ्यात तेथे शुभम आला. दोघांनी मिळून शिवीगाळ करत अमोल दुड्डे यांना मारहाण केली. दोन्ही कर्मचाऱ्यांची वाट आरोपींनी अडवून ठेवली. ही माहिती साहाय्यक अभियंता ई. ए. शेख यांना समजताच ते तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी अमोलच्या तक्रारीवरुन तेजस, शुभम विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.