गुंड पप्पू कलानीला अखेर पॅरोल मंजूर 

गुंड पप्पू कलानीला अखेर पॅरोल मंजूर 
Updated on

डोंबिवली - उल्हासनगर महापालिका निवडणुकीत "टाडा'फेम अशी ओळख असलेला कुख्यात गुंड पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या मदतीने वडील पप्पू कलानी याला भविष्यात मुभा मिळविण्याच्या दृष्टीने ही युती केल्याची चर्चा त्या वेळी होती. या युतीचा फायदा झाला असून, अखेर शुक्रवारी पप्पू कलानी याला पॅरोल मिळाला आहे. 

उल्हासनगरच्या राजकारणात कलानी कुटुंबीयांचे वजन पाहता "पार्टी विथ डिफरन्स'चे बिरूद मिरविणाऱ्या भाजपने आणि "स्वच्छ प्रतिमा' अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओमी यांच्याशी जवळीक साधल्याने या हातमिळवणीच्या मागे बरेच काही शिजत असल्याची चर्चा होती. फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याचा भविष्यात ओमी कलानींना फायदा होईल, असा अंदाजही व्यक्त होत होता, तो खरा ठरला आहे. 

याआधी पप्पू कलानी याचा पॅरोलचा अर्ज नाकारण्यात आला होता. त्याला एकदाही पॅरोलवर येण्याची संधी मिळाली नव्हती. पत्नीचा अपघात झाल्यानंतरही अतिदक्षता विभागात असतानाही पॅरोल नाकारला होता; मात्र उल्हास महापालिका निवडणुकीनंतर आणि राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पप्पू कलनीला पॅरोल मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.