डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीत उभी फूट पडल्याचे पहायला मिळत आहे. तत्कालीन अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी संघटनेच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. याविषयी समितीतील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची नव्याने अध्यक्षपदी निवड केली आहे.