Sanjay Raut: गॅसचे दर 200 रुपयांनी कमी झाले हे 'इंडिया' आघाडीचं यश; राऊतांचा सरकारला खोचक टोला

केंद्र सरकारनं देशातील जनतेला रक्षा बंधननिमित्त घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची कपात केल्याची घोषणा केली.
sanjay raut
sanjay rautEsakal
Updated on

Mumbai News : केंद्र सरकारनं देशातील जनतेला रक्षा बंधननिमित्त घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची कपात केल्याची घोषणा केली. पण याचं क्रेडिट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीला दिलं आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक उद्या आणि परवा (३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर) पार पडणार आहे.

यापार्श्वभूमीवर तयारीच्या माहितीसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Domestic gas prices reduced by Rs 200 is the success of India Aghadi says Sanjay Raut)

राऊत म्हणाले, पाटणा आणि बंगलोर नंतर इंडिया आघाडी मुंबईत होत आहे. त्यामुळं मुंबईचं वातावरण 'इंडिया'मय झालं आहे. ममता दीदी म्हणाल्या होत्या की, घरगुती गॅसच्या किंमती कमी झाल्या हे इंडियाचं यश आहे.

तर लालू यादव म्हणाले, मोदीच्या नरड्यावर बसायला मी मुंबईत इंडियाच्या बैठकीला चाललो आहे, त्यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढणार आहे. सगळे प्रमुख नेते या बैठकीसाठी येत आहेत. ६ राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला येणार आहेत, अशी माहिती देखील यावेळी संजय राऊत यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड तसेच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई, सचिन अहिर, सुनील शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.