मुंबई: जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतातही आतापर्यंत ५५० पेक्षा जास्त लोकांचा यामुळे बळी गेला आहे. कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे करता येतील यावर अनेक देशांमध्ये संभ्रम आहे.
अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह समुद्रात फेकण्यात येत आहेत असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच समुद्रातले मासे खाऊ नका, कारण जर हे मृतदेह मासे खातील आणि तेच मासे तुम्ही खाल्ले तर काय होईल याचा विचार करा, असंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. समुद्रकिनाऱ्यावर पडलेले मृतदेह यात दाखवण्यात आले आहेत. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे आहेत असा दावा यात करण्यात आला आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य सांगणार आहोत.
काय आहे या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य:
हा व्हिडिओ २०१४ ला लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावरचा आहे. ज्या ठिकाणी १०० शरणागतींचे मृतदेह मिळाले होते. याचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाहीये. युट्युबवर या व्हिडिओचं शीर्षक ‘Dozens of migrant bodies are washed ashore in Libya’असं होतं. लिबियाच्या प्रशासनानं समुद्र किनाऱ्यावर १०० पेक्षा जास्त मृतदेह ताब्यात घेतले होते. शरणागतींचं जहाज उलटल्यानं यात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे हे मृतदेह होते. व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या गोष्टी काही प्रमाणात कोरोना व्हायरससारख्या आहेत त्यामुळे हा व्हिडीओ लोकांना खरा वाटतो आहे. मात्र कोरोना व्हायरचा आणि या व्हिडिओचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झालंय.
dont eat sea food becoause covid 19 bodies are dumpde into the sea fact check
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.