दुकानात वाईन विक्री नकोच, मुंबईच्या डबेवाल्यांची विनंती

व्यसन हे समाज विघातक आहे. त्यामुळे व्यसनाला प्रोत्साहन देऊ नये. वाइन ला दुकानात विक्रिस परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे.
Wine
WineSakal
Updated on
Summary

व्यसन हे समाज विघातक आहे. त्यामुळे व्यसनाला प्रोत्साहन देऊ नये. वाइन ला दुकानात विक्रिस परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे.

मुंबई - व्यसन (Addiction) हे समाज विघातक आहे. त्यामुळे व्यसनाला प्रोत्साहन देऊ नये. वाइन (Wine) ला दुकानात विक्रिस परवानगी (Shop Selling Permission) देण्याचा विचार सरकार (Government) करत आहे. मात्र, त्यामुळे समाजातील तरुण पिढी (Youth Generation) व्यसनाच्या आहारी जातील अशी भीती व्यक्त करत दुकानात वाइन विक्रीस विरोध दर्शवला आहे.

सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन, मावा खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुफ्फुस, हृदय, जठर, मूत्रपिंड, श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. शिवाय या व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम होऊन मानसिक त्रास होतो. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ आहे असे डबेवाल्याचे म्हणणे आहे.

Wine
मुंबई महापालिकेचा अंदाज चुकला; कोट्यावधीचा फटका

व्यसनामुळे शारिरीक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, हानी होते म्हणून माणसाने कोणतेही व्यसन करू नये. हाच संदेश आम्ही नेहमी देत असतो.

आम्ही फक्त संदेशच देत नाही तर या व्यसनापासून चार हात लांब आहोत. आम्ही वारकरी आहोत तुळशीमाळ गळ्यात घालतो. त्यामुळे आम्हाला कोणतेच व्यसन नाही. आणी लोकांनाही व्यसना पासून दूर रहा असा सल्ला देत असतो. गुजरात, बिहार या राज्यांत जशी दारूबंदी लागू करण्यात आली आहे, तशीच महाराष्ट्रातही लागू करायला पाहीजे होती,पण येथे तर आता दुकाना मध्ये वाईन मिळणार आहे. या मुळे वाईन घरा जवळच उपलब्ध होईल. यामुळे समाजातील काही घटक व्यसनाच्या आहारी जातील. तेव्हा सरसकट दुकानावर वाईन मिळेल असा घातक निर्णय शासनाने घेऊ नये अशी विनंती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.