"ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...

"ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...
Updated on

मुंबई : जमाना डिजिटलचा आहे. जे काम घरून होणार नाही असं बोलणारे आपण गेले चार महिने घरूनच ऑफिसची सगळी कामं कारतोय.  किराणा, घरात लागणाऱ्या भाज्या देखील मोबाईलवरून ऑर्डर करण्याची आता सोया उपलब्ध आहे. कोणताही प्रश्न उद्भवला की आपण चटकन खिशातला मोबाईल काढतो, गुगल किंवा आपल्याच हवं ते ऍप्लिकेशन सुरु करतो आणि आपल्या शंकेचं निराकरण करतो. सोशल मीडिया सोबतच बँकिंग, मनोरंजन, खेळ,  शिक्षण, आरोग्य या सर्वांशी निगडित असंख्य ऍप्लिकेशन्स  आजच्या घडीला इंटरनेट जगतात उपलब्ध आहेत.

मात्र उपलब्ध असणाऱ्या शेकडो ऍप्लिकेशनमुळेच आपल्याला अधिक सजग राहायची गरज आहे. नाहीतर कोण आपल्याला कसा ऑनलाईन गंडा घालेल काही सांगता येणार नाही. कोरोनाच्या सावटाखाली अनेक ऑनलाईन ठगांचं फावतंय. 

ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि घरच्याघरी रक्तातील ऑक्सिजन तपासा ? 

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये नागरिकांना भीती दाखवून कंपनी स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतेय असं बोललं जातंय. या मेसेजमध्ये आपल्या मनातील कोरोनाच्या भीतीचा फायदा उचलून तुम्हाला एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितलं जातं. 'हे ऍप इन्स्टॉल करा आणि कोरोना काळात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा', असं यामध्ये म्हटलंय. 

महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव म्हणतात...

सध्या WhatsApp वरून हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी हा मेसेज धादांत खोटा असल्याचं म्हणलंय. अशा प्रकारच्या ऍप्लिकेशनचा वापर करून आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासणं धोक्याचं ठरू शकतं. कारण रक्तातील ऑक्सिजन तपासण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ऍप किंवा ऍप बेस्ड तंत्रज्ञान अजून सिद्ध झालेलं नाही. अशा ऍप्लिकेशनच्या वापराने तुमचा पर्सनल डेटा घोक्यात येऊ शकतो असंही यशस्वी यादव म्हणालेत.   

कोणतंही मोबाईल ऍप्लिकेशन वापरताना काय काळजी घ्यावी ? 

कोणतंही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याआधी त्याबद्दल ऍपखाली दिलेले रिव्ह्यू वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामाध्यमातून लोकांना ते ऍप भावलं का ? ते ऍप वापरताना काही त्रास होतोय का? याबाबत खरी माहिती मिळू शकेल. सोबतच किती जण हे ऍप वापरतायत, लोकांनी त्या ऍपला किती रेटिंग दिलंय हेही आपल्या समजू शकतं. एखादं ऍप डाउनलोड करताना त्यासारख्या इतर ऍप्सबद्दलही आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला सर्वोत्तम ऍप निवडायलाही मदत होते. ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावरही आपल्याला काळजी घेणं गगरजेचं आहे. इन्स्टॉलेशन झाल्यावर ऍप आपल्याला अनेक परमिशन मागतो. सर्वच परमिशन देणं गरजेचं नाही. अनावश्यक गोष्टींना परमिशन देऊ नका.   

dont trust on a viral message stating install app and check your oxygen level in blood

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.