'निसर्ग' चक्रीवादळ धडकलं तरीही घाबरू नका, चक्रीवादळाआधी आणि नंतर काय करावं किंवा करू नये, वाचा..

cyclone
cyclone
Updated on

मुंबई: मुंबईनं आजपर्यंत कित्येक महाभयंकर संकटांचा सामना केला आहे. २६/११ चा हल्ला असो वा दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत तुंबणारं पाणी. मुंबईनं कधीच कोणासमोर हार मानली नाही. मात्र आता मुंबईवर दुहेरी संकट उद्भवलं आहे. एकीकडे संपूर्ण मुंबई कोरोनाच्या संकटात सापडली आहे तर दुसरीकडे 'निसर्ग' नावाच्या महाभयंकर चक्रीवादळानं मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांकडे कूच केलीये. मात्र आता घाबरू नका. यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं आणि काय नाही हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.  त्यानुसार हे चक्रीवादळ ३ जूनला मुंबईच्या किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.

मुंबईपासून ६७० किलोमीटर दूर: 

हे चक्रीवादळ सध्या मुंबईपासून ६७० किलोमीटर दूरवर तयार झालं. जेव्हा हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यांवर येईल तेव्हा मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर आता या तीन जिल्ह्यांच्या कोस्टल गार्ड्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. यावेळी मुंबईत ८०-१०० किलोमीटर प्रतितास या वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे या निसर्ग चक्रीवादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. या महत्वाच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.

चक्रीवादळ येण्याआधी: 

-- घाबरू नका, शांतपणे स्थिती हाताळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
-- संपर्क अबाधित ठेवण्यासाठी आपले मोबाईल्स पूर्णपणे चार्ज करून ठेवा. SMS चा वापर करा. 
-- रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमान पत्रातून सतत हवामानातल्या बदलांची माहिती घेत राहा.
-- तुमची महत्वाची कागदपत्रं आणि मौल्यवान वस्तू वॉटरप्रूफ गोष्टीत बंद करून ठेवा.
-- बचावासाठी आणि जगण्यासाठी काही गोष्टी जवळ ठेवा. 
-- आपल्या घरात कुठल्याही धारदार वस्तूला मोकळं ठेऊ नका. 
-- आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. 

चक्रीवादळादरम्यान किंवा नंतर:

-- तुमच्या घरचा विजेचा पुरवठा आणि गॅस बंद करा. 
-- दारं किंवा खिडक्या उघडू नका. 
-- तुमचं घर असुरक्षित असेल तर चक्रीवादळ येण्याआधी ते सोडून सुरक्षित जागी जा. 
-- उकळलेलं पाणी सतत पित राहा.
-- अफवांवर विश्वास ठेऊ नका.
-- पडक्या इमारतीत जाऊ नका किंवा विद्युत वाहिनीला हात लावू नका.
-- मच्छीमारांनो यावेळी समुद्रात जाऊ नका. 

या सूचनांचं पालन केल्यामुळे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला या चक्रीवादळापासून वाचवू शकता. त्यामुळे घाबरू नका आणि या संकटाचा जिद्दीनं सामना करा.     

dos and donts issued by NDRF before nisarg cyclone must read story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.