मुंबई, ता. 23 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या उत्तर, दक्षिण, मध्य आणि मराठवाडा या भागात तुरळक मेघगर्जनेसह तसेच विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. याशिवाय राज्यातील काही भागांमध्ये गरपिटीचाही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी देखील उत्तर, दक्षिण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील 2 दिवस हवामान कोरडे राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा- विनायक शिंदे हाच सचिन वाझे यांचा कलेक्टर!
हे करू नका
खलील महत्त्वाच्या गोष्टीही पाळा
dos and donts while lightning thunders and hail storm read full guides beneficial for farmers
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.