मुंबईकरांनो कोरोनाचा कुठला व्हेरिएन्ट जास्त धोकादायक ते समजून घ्या...

हा गेल्या दीड महिन्यांतील सध्याच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो
Corona vaccinations
Corona vaccinationsEsakal
Updated on

मुंबई : यूके व्हेरिएंटमध्ये (uk variant)अधिक संक्रमण आणि गंभीर कोविड रोग होण्याची संभावना असल्याचे म्हटले जात होते. मात्र या व्हेरिएन्टचे प्रमाण देशभरात सध्या घटत आहे. परंतु, यूके व्हेरिएंटची संख्या घटत असल्याचे दिसून येत असले तरी, महाराष्ट्रात सापडलेला डबल म्यूटंट व्हेरिएन्ट (Double mutant variant)बी .1.617 हा गेल्या दीड महिन्यांतील सध्याच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो, असे नॅशनल सेंटरने म्हटले आहे. (Double mutant variant is more dangerous than uk variant)

डबल म्यूटंट व्हेरिएन्ट हा कोविड प्रकार सर्वप्रथम भारतात आढळून आला व ते कमीतकमी 17 देशांमध्ये पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. डबल म्युटंटमुळे यूके व्हेरिएंटची महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये वाढलेली प्रकरणे कमी होत आहेत .बी .1.617 वंश महाराष्ट्रात दिसून आल्यानंतर तो आता बर्‍याच ठिकाणी दिसून येत आहे. काही राज्यांत गेल्या दीड महिन्यांतील प्रकरणामध्ये डबल म्यूटंट वाढण्यामध्ये युके व्हेरिएन्टचा संबंध असल्याचे म्हटले आहे.

Corona vaccinations
मुंबईकरांनो, लसीकरणाला जाण्यापूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा

डबल म्यूटंटचे रूपांतर किंवा साथीचे क्लिनिकल सह-संबंध अद्याप पूर्ण झाले नाहीत. युके व्हेरिएन्टसाठी सेन्टिनल जीनोम सिक्वेन्स ठेवणे गरजेचे असून भारतात एप्रिल 2020 मध्ये सुरू झाले. व्हेरिएन्ट आणि साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव यांच्यात सहसंबंध असल्याचे समोर आल्यास चिंतेचे रूप समोर येईल असे बायोटेक्नॉलॉगी विभागाच्या सचिव रेणू स्वरूप म्हटल्या. तर सर्व प्रश्नांची उकल तसेच विषाणूचा परस्परांशी संबंध कळेपर्यंत जीनोमिक सिक्वेन्स ठेवणे महत्त्वपूर्ण आहे असे ही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()