मुंबई: गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवलेल्या अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडेंची हकालपट्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, विद्यापीठाच्या वतीने हकालपट्टीचा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे डॉ. रानडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कायम राहणार आहेत.