रेल्वे स्थानकातून ते चैत्यभूमीपर्यंतचे रस्ते गर्दीने भरून गेले आहेत.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या (Chaitya Bhoomi Mahaparinirvan Din) पूर्वसंध्येला देशभरातील भीम अनुयायी दादरमध्ये दाखल झाले आहेत. रेल्वे स्थानकातून ते चैत्यभूमीपर्यंतचे रस्ते गर्दीने भरून गेले आहेत. अनेक अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेण्यासोबतच आंबेडकरी साहित्य खरेदीवर भर दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनुयायी दादरमध्ये दाखल होत आहेत. महापालिकेने शिवाजी पार्क येथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली असून अनेक कुटुंबे येथे विसावली आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. काही अनुयायांनी दर्शनासाठी लागणारी रांग आणि उसळणारी गर्दी लक्षात घेऊन आजच चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केले.
महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांनी पाण्यासह अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सकाळ व संध्याकाळचा नाष्टा तसेच जेवणाची मोफत व्यवस्था आहे. काही संघटनांनी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्रचिकित्सा केली जात आहे.
अनेक अनुयायी पुस्तकांच्या दुकानांवर गर्दी करत असल्याचे दिसत आहे. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांबरोबरच संविधानाला अधिक मागणी आहे. बेस्ट प्रशासनाकडून विविध सुविधांसह मोफत पुस्तकवाटप केले जात आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे ‘महामानव’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे करण्यात आले. या वेळी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, भन्ते राहुल बोधी, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, रमेश जाधव आदी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त अश्विनी जोशी यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट प्रशासनाकडून दरवर्षी विविध सुविधा पुरवल्या जातात. यंदा ही आमचे अनेक कर्मचारी येथे श्रमदान करत आहेत. अनुयायांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही आदरांजली वाहत आहोत.
-विजय सिंघल, महाव्यवस्थापक, बेस्ट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.