भिक्षेकरी समाजातील एकमेव "शिक्षित"

भटक्‍या विमुक्‍तांच्या प्रश्नांवर डॉ. कालिदास शिंदे यांचे लेखन
Education
EducationSakal
Updated on

कामोठे : स्वातंत्र प्राप्तीच्या सात दशकानंतरही गावाबाहेर राहणाऱ्या भटक्या व विमुक्त समाजाचा सामाजिक स्तर उंचावलेला नाही. मूलभूत हक्कांपासून हा समाज आजही कोसो दूर आहे. पनवेलमधील खांदा वसाहतीपासून काही अंतरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भटक्‍या व विमुक्त समाजातील लोक अनेक वर्षांपासून पालामध्ये (कापडी झोपडी) वस्ती करून आहे. याचा ठिकाणी राहणाऱ्या कालिदास शिंदे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ‘नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा सामाजिक व मानव वंश शास्त्र’ या विषयावर पीएच.डी. मिळवली आहे. भटक्या विमुक्तांचे जगण्याचे प्रश्न या विषयावरील प्रबंध अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.

Education
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, पाहा फोटो

भटक्या जमातीमधील भिक्षेकरी डवरी गोसावी समाजात कालिदास शिंदे याचा जन्म पाला बिऱ्हाडात सांगलवाडी येथे झाला. परंतु त्‍याच्या जन्माची नोंद झाली नाही. कोल्‍हापूरमधील आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर १९९९ मध्ये फलटणमधील महाविद्यालयातून पदवी मिळवली. या कालावधीत कालिदास यांचे आई वडील गणेशोत्सवात पाल बिऱ्हाड घेऊन भीक मागण्यासाठी पाहुण्यांच्या साथीने खांदा गावात आले. गणेशोत्सवाच्या सुट्टीत पालावर येताच कालिदास यांनी फकिराच वेष धारण करून भीक मागण्याचे काम केले. यासाठी मिळेल ते काम केले.

image-fallback
अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण संपन्न

नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन भीक मागणे हेच आहे. खांदा गावात असताना भीक मागताना अनेक अडचणी, जीवघेणे प्रसंग, पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागायचा. यावेळी कालिदास यांनी आमचा समाज भीक मागून जगेल, पण चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही, असे पोलिसांना समजावून सांगत. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिक्षणाची संधी मिळाली. एमफीलसाठी त्‍यांना सरकारच्या शिष्यवृत्ती मिळाल्‍यावर त्‍यांनी २०१८ मध्ये डॉक्टरेट पदवी संपादित केली.

अविनाश जगधने

भिक्षेकरी समाज उपेक्षित

काही विमुक्त जमाती भटकंती थांबवून शिक्षणाच्या प्रवाहात येत विकासाकडे वाटचाल करीत आहेत. मात्र भिक्षेकरी समाज आजही पारंपरिक उपजीविकेवरच जगत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊनही त्यांच्या काखेची झोळी हटली नाही. या जमातीच्या उपजीविकेचे प्रश्न कायम आहेत. दाखल्‍यांअभावी घरकुलसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.