मुंबई - मागील काही वर्षात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदापासून संचालक आदी विविध महत्त्वाच्या पदावर माटुंगा येथील व्हीजेटीआय संस्थेतील अनेक जणांची वर्णी लागली, त्याचा कित्ता पुन्हा एकदा आता कुलसचिव पदासाठी गिरवण्यात आला आहे.
विद्यापीठाने कुलसचिव पदासाठी व्हीजेटीआय मधील प्रसाद कारंडे यांची निवड केली असल्याने विद्यापीठाला दुसऱ्या संस्थेतील तज्ञ विद्यापीठाला मिळत नाहीत काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.