राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

२३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
voting
votingSakal
Updated on

मुंबई : राज्यभरातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८ आणि नवनिर्मित सात अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि १ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर अखेर २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील, अशीही माहिती मदान यांनी दिली.

voting
महापालिकेच्या रिक्त जागेसाठी १२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

निवडणूक होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे :
१. ठाणे- मुरबाड व शहापूर
२. पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा
३. रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
४. रत्नागिरी- मंडणगड, दापोली
५. सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे
६. पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित)
७. सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडुज, खंडाळा, दहीवडी
८. सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ
९. सोलापूर- माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)
१०. नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी

voting
नाशिक : पिंगळे गटाकडून ‘आपला पॅनल’ची घोषणा

११. धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ
१२. अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी
१३. जळगाव- बोदवड
१४. औरंगाबाद- सोयगाव
१५. जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
१६. परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी
१७. लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
१८. उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.
१९. नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर
२०. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ

voting
हिंगोली : ट्रक चालकाला पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध देऊन लुटले

२१. अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर
२२. बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा
२३. यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी
२४. वाशीम- मानोरा, मालेगाव
२५. नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर
२६. वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
२७. भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर
२८. गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी
२९. चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही
३०. गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.