Gold Smuggling : देशभरात 'गोल्ड रश' कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त

आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
DRI
DRISakal
Updated on

DRI Seizes Smuggled Gold : डीआरआयने ऑपरेशन 'गोल्ड रश' अंतर्गत सुमारे 33 कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे पकडली आहेत. सुमारे 65.46 किलो सोन्याची खेप ईशान्य देशांतून मुंबई-पाटणा-दिल्ली येथे तस्करीमार्गे आणण्यात आली होती. करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिझोराममधून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करून एक मोठी खेप भारतात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन गोल्ड रश सुरू करण्यात आले होते. तस्करीसाठी देशांतर्गत कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर करण्यात आला होता. तस्करी करून आणण्यात येणाऱ्या सोन्याच्या खेप विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंमध्ये लपवून आणण्यात आल्या होत्या. केलेल्या कारवाईत DRI ने महाराष्ट्रातील भिवंडी येथे ऑपरेशन गोल्ड रश अंतर्गत 120 सोन्याची बिस्किटे पकडली असून,ज्यांचे वजन सुमारे 19.93 किलो तर, किंमत अंदाजे 10.18 कोटी रुपये आहे.

DRI
Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

याशिवाय परदेशातून मिझोराममध्ये आलेले आणि तेथून मुंबईत पोहोचलेल्या याच मालाच्या 2 खेप दिल्ली आणि पाटणा येथे कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पाटणा येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामावर छापा टाण्यात आला. यामध्ये 28.57 किलो वजनाची आणि सुमारे 14 कोटी रुपये किंमतीची 172 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.

394 सोन्याची बिस्किटे जप्त

तस्करी करून भारतात आणली जाणारी तिसरी खेप दिल्लीतून पकडण्यात आली असून, येथून 16.96 किलो वजनाची 102 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. याची अंदाजे किंमत 8.69 कोटी रुपये आहे. या सर्व कारवाईत DRI ने एकूण 394 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. ज्यांचे वजन 65.46 किलो तर, एकूण अंदाजे किंमत 33.40 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.