मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं अखेर अटक केली आहे. यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आलं. दरम्यान, आजच त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
शनिवारी एनसीबीने मुंबईकडून गोव्याला जाण्याऱ्या क्रूझ जहाजावर छापेमारी केली. यावेळी 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होता. या पार्टीसाठी जवळापस 600 जणांची उपस्थिती असल्याचंही समोर आली आहे. रेव्ह पार्टीत कोकेन, चरस, मेफेड्रोन, एक्सटसी अशा प्रकारचे ड्रग्स या पार्टीत असल्याचंही तपासात समोर आलंय. आर्यन याचा मोबाइलही एनसीबी जप्त केला आहे.
एनसीबीच्या कारवाईचा घटनाक्रम
या ड्रग्ज पार्टीसाठी ८० हजार ते ५ लाख तिकिट आकारण्यात आलं होत.
2 हजार जणांची क्षमता असताना क्रूझवर फक्त १ हजारहून अधिक जणांना प्रवेश देण्यात आला.
इनस्टाग्रामहून या ड्रग्ज पार्टीचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
पार्टीतील बहुतांश तरूण हे दिल्लीचे असल्याचे चौकशीत समोर
एनसीबीने कारवाईला सुरूवात करताच अरबाजने बुटात ड्रग्ज लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याची अंग झडती घेतल्यानंतर ही बाब उघड
ताब्यात घेण्यात आलेला महिलेच्या पर्सच्या हँडलमधील पोकळ जागेतून हे ड्रग्ज पार्टीत सुरक्षा रक्षकाची नजर चुकवत आणण्यात आलं.
एका तस्कराच्या शर्टच्या कॉलरमधून तसेच ट्राउझरचा पट्टा आणि अंडरवेअरच्या शिलाईतून ते क्रूझवर आणण्यातआलं.
2 ऑक्टोबर सकाळी 11 वा. NCB चे अधिकारी साध्या वेशात क्रूझवर दाखल झाले.
दुपारी 2 च्या सुमारास क्रूझने बंदर सोडल्यानंतर पार्टीला सुरूवात झाली.
दीडच्या सुमारास पार्टी ऐन रंगात असताना NCB च्या अधिकारयांनी आपली ओळख सांगत कारवाईला सुरूवात केली.
दुपारी 4 च्या सुमारास NCB अधिकाऱ्यांना काही जणांकडे चरस, कोकेन, एमडी ड्ग्ज मिळून आले.
सायंकाळी 4 च्या सुमारास क्रूझचा प्रवास थांबवून 6 च्या सुमारास क्रूझ पुन्हा बंदरावर आणण्यात आली.
ड्रग्ज आणि संशियत आरोपींचे पंचनामे क्रूझवर केले आणि संशयितांना कायदेशी प्रक्रिया करू 11 च्या सुमारास पुन्हा 4 जणांना घेऊन NCB अधिकारी कार्यालयात आले.
त्यानंतर मध्य रात्री 1:30 च्या सुमारास NCB अधिकारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह 9 जणांना घेऊन NCB कार्यालयात आले.
यातील 8 जणांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिर 3 च्या सुमारास गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू केली. तर मध्यरात्री सहभाग नसलेल्या 5 जणांना NCB अधिकाऱ्यांनी सोडलं.
सकाळी 10 च्या सुमारास 8 आरोपी मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाझ मर्चंट यांच्यावर अधिकृत गुन्हा दाखल केल्याचं जाहीर केलं.
दुपारी 2 वा. ज्या क्रूझवर ही पार्टी सुरू होती त्या कार्डिलिया क्रूझकडून घटनेचा निषेध करत तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचं अधिकृत माहिती देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.