Mumbai Accident: लालबाग परिसरात धक्कादायक प्रकार, बस चालकासोबत भांडण करत मद्यपीने पकडली स्टेअरिंग; तरुणीचा मृत्यू

Mumbai Lalbagh area Accident News: मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बस चालकासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मद्यपीने बस चालकाशी भांडण करत थेट स्टेअरिंगच पकडली.
Mumbai Accident
Mumbai Accident
Updated on

Mumbai Accident News: मुंबईच्या लालबाग परिसरात भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या बस अपघातात ८ प्रवाशी जखमी झाले आहेत, तर एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बस चालकासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मद्यपीने बस चालकाशी भांडण करत थेट स्टेअरिंगच पकडली. त्यामुळे नियंत्रण सुटून नऊ पादचाऱ्यांना धडक बसली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री लालबाग परिसरात बसची ९ जणांना धडक बसली. यात २ महिलांचा समावेश होता. बसमध्ये दारुच्या नशेत चढलेल्या व्यक्तीने ड्रायव्हरसोबत वाद घातला होता. नशेत असलेल्या व्यक्तीने ड्रायव्हरला ओढल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला आहे. जखमी ९ पैकी ८ जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.