कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार

कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार
Updated on

मुंबई : कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने  (आयसीएमआर) कडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात अचूक निदान होणार आहे.

कोरोना निदान करण्यासाठी सध्या ऍंटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. एँटीजेन चाचणी ही झटपट होत असली तसेच कमी खर्चीक असली तरी तिचे निदान विश्वसनीय नाही. तर आरटी - पीसीआर चाचणी वर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत असला तरी या चाचणीचे अचूक निदान 75 टक्क्यांच्या वर नाही. शिवाय या चाचणीचे निकाल येण्यास वेळ ही लागतो.
देशातील दिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय आहे. शिवाय ही चाचणी कमी खर्चिक असून या चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे केवळ 30 मिनिटात झटपट निदान करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचणी चे निदान 99 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

सीएसआयआर-सीसीएमबी हैदराबादने आरटीपीसीआर आधारित एसएआरएस-सीओव्ही -2 शोधण्यासाठी आरएनए एक्सट्रक्शन फ्री ड्राई स्वाब पद्धत विकसित केली आहे. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) आणि आरएनए माहितीचा वापर करून मानक पीसीआर चाचणीच्या तुलनेत या पद्धतीमुळे वेळ कमी होईल आणि खर्च कमी होईल. या पद्धतीमध्ये संशयित सार्स-सीओव्ही -2 रूग्णांकडून व्हीटीएम कमी ड्राय तोंजातून किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो . त्या नंतर लॅबमध्ये ट्रॅस-ईडीटीए - प्रोटीनेस के बफर जोडला जातो आणि नमुने खोलीच्या तपमानावर 30 मिनिटे उकळविला जातो. त्यानंतर नमुना 6 मिनिटांसाठी 98 सी तापमानात तापवला जातो.  

दुसरी लाट थोपवण्यासाठी अचूक आणि जलद चाचण्यांची गरज आहे. अशा वेळी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, तसेच मास स्क्रिनिंगसाठी  ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे. 

Dry RTPCR test for Corona Accurate diagnosis will be made in less time 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.