आर्यनला वाचवण्यासाठी दादलानीने गोसीवाला ५० लाख दिले, सॅमचा गौप्यस्फोट

डिसूझाने पैसे मोजले व फक्त ३८ लाख रुपये असल्याचे सांगितले.
आर्यनला वाचवण्यासाठी दादलानीने गोसीवाला ५० लाख दिले, सॅमचा गौप्यस्फोट
Updated on

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) ड्रग्ज प्रकरणात तुरुंगातून सुटला असला, तरी या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता शाहरुखन खानची मॅनेजर पूजा दादलानीने (Pooja dadlani) आर्यनला वाचवण्यासाठी के.पी.गोसावीला (kp gosavi) ५० लाख रुपये दिल्याची नवीन माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सॅम डिसूझाने हा दावा केला आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून सॅम डिसूझाचे नाव घेतले होते.

सॅम डिसूझाने एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत हा खळबळजनक दावा केला आहे. पूजा दादलानीने आर्यनला अटकेपासून वाचवण्यासाठी पैसे दिले होते. पण आर्यनची सुटका शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर ते सर्व पैसे परत केले, असे डिसूझाने म्हटले आहे. डिसूझा बिझनेसमॅन आहे. पूजा दादलानीने ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या के.पी.गोसावीला ५० लाख रुपये दिले होते. पण गोसावी फसवणूक करु शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याने गोसावीला ते सर्व पैसे दादलानीला परत करायला सांगितले.

आर्यनला वाचवण्यासाठी दादलानीने गोसीवाला ५० लाख दिले, सॅमचा गौप्यस्फोट
जाणून घ्या समीर वानखेडेंची संपत्ती, कुठे किती एकर जमीन, किती फ्लॅट

प्रभाकर साईलने त्याच्या प्रतिज्ञापत्रात गोसावी, दादलानी आणि डिसूझा ३ ऑक्टोबरला सकाळी भेटले होते, असे म्हटले आहे. एक व्यक्ती कारमधून आली, तिने साईलकडे दोन बॅगा दिल्या. ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबलेल्या डिसूझाकडे साईल या दोन बॅग घेऊन गेला. डिसूझाने पैसे मोजले व फक्त ३८ लाख रुपये असल्याचे सांगितले, प्रतिज्ञापत्रात ही सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

आर्यनला वाचवण्यासाठी दादलानीने गोसीवाला ५० लाख दिले, सॅमचा गौप्यस्फोट
Facebook चा आणखी एक महत्वाचा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद

"गोसावी फोनवरुन कोणाबरोबर तरी बोलत असताना, २५ कोटी रुपयाची मागणी केल्याचं आपण ऐकलं, त्यातले आठ कोटी रुपये समीर वानखेडेंना देणार असल्याचं ते बोलत होते" असा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. "आम्ही गोसावीवर दबाव टाकून त्याच्याकडून ३८ लाख रुपये परत मिळवले. उर्वरित रक्कम आम्ही मॅनेज करुन दादलानीला परत केली. गोसावी चिटर असल्याचं आमच्या लक्षात आलं" असं डिसूझा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.