रायगड जिल्ह्यात पावसाच्या भितीमुळे भात झोडणीची कामे वेगात

रायगड जिल्ह्यात पावसाच्या भितीमुळे भात झोडणीची कामे वेगात
Updated on

अलिबाग - बहरून आलेल्या भात पिकावर परतीच्या पावसाचे सावट पडल्याने निम्म्याहून अधिक भात शेती पाण्याखाली गेली. गेल्या चार दिवसापासून ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी पावसाच्या भितीने कापणी करून भात झोडणीची कामे सुरु केली आहेत. त्यामुळे ही भात झोडणीची कामे वेगात सुरु झाली आहेत. 

यंदा पाऊस समाधानकारक पडला असल्याने जिल्हयातील भात पिक बहरून गेले. कापणी योग्य भात पिक झाल्याने जिल्हयातील शेतकरी कापणीसाठी सज्ज झाले होते. परंतू ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे भात पिक पाण्याखाली गेले. काही भातांची रोपे पाण्यात आडवी झाल्याने पुर्णतः भातपिक खराब झाले. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परंतू गेल्या चार दिवसापासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे.

शेतावरील पाणीदेखील कमी झाल्याने सुरक्षीत राहिलेल्या भात पिकांची कापणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून त्याच दिवशी भात झोडणीची कामेदेखील वेगात सुरु केली आहे. यंदा परतीच्या पावसाने गेलेली भात शेतीची भरपाई मिळेल तेव्हा मिळेल. पण जे भात पिक सुरक्षीत राहिले आहे. त्यातून काही तरी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्हयात गेल्या चार दिवसापासून कापणीबरोबरच झोडणीचे कामे जोरात सुरु झाली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कापणी करून थोडा भात रोपाला ऊन देऊन तातडीने झोडणीचे कामे केली जात आहे. 

पाऊस काही थांबत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी जे पिक कापणी योग्य आहे. ते पिक तातडीने कापून ते सुरक्षीत कसे ठेवता येईल याकडे लक्ष दयावे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी. 

Due to fear of rains in Raigad district paddy threshing work is in full swing

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.