कोरोनामुळे धारावी झाली 'बदनाम वस्ती', आता इथल्या नागरिकांना सहन करावा लायतोय 'हा' त्रास...

कोरोनामुळे धारावी झाली 'बदनाम वस्ती', आता इथल्या नागरिकांना सहन करावा लायतोय 'हा' त्रास...
Updated on

मुंबई, धारावी : कोरोनाने संपूर्ण जगाला विळख्यात घेतले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत सुरवातीला कोरोनाचा संसर्ग फारसा जाणवला नाही. मात्र  हळूहळू मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. त्यात धारावी सुरक्षित वाटत असतानाच अचानक बालिगा नगर येथे कोरोना ने पहिला बळी गेला आणि कोरोना ने धारावीत आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. दिवसेंदिवस दिवस धारावीत रुग्ण वाढीचा वेग वाढला, त्यामुळे प्रसारमाध्यमात धारावी अग्रस्थानी येऊ लागली. यामुळे अख्या जगाच धारावी कडे लक्ष वेधून घेतले.

धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. जर धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर हाहाकार उडणार. त्याचा परिणाम मुंबईसह अख्ख्या जगाला भोगावा लागेल असे वातावरण निर्माण झाले. यासर्व घडामोडींमुळे धारावीतील रहिवासी असुरक्षित झाले. आज परस्थिती अशी झाली आहे की, धारावीतील रहिवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत घेण्यास टाळाटाळ होऊ लागली आहे. 

कोरोना चा दुष्परिणाम आज धारावीतील रहिवाशांना जाणवू लागला आहे. तरुणांपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या रहिवाशांना जे खासगी कार्यालयात, कंपन्यांमध्ये  करत होते या सर्वांना याची आता प्रचिती येतेय. त्यांना कामावर येऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत. तुम्ही धारावीत राहत असल्याने आम्ही विचार करून आपल्याला कळवतो अशी उत्तरं आता त्यांना मिळतायत. नोकरी जाण्याची मोठी भीती या स्थानिकांमध्ये निर्माण झालीये. 

काहीजणांनी नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक "सकाळ" शी बोलताना सांगितलं की, मालक पुन्हा नोकरीवर घेणार नसल्याचे आडमार्गाने कळले आहे. जर हाताला असलेलं काम हिरावलं गेलं तर जगायचं कसं असा प्रश्न आता इथले तरुण विचारतायत. अशात आमच्या समोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नसल्याचे या लोकांच्या बोलण्यातून जाणवत आहे. यामुळे धारावीत बेरोजगारीमुळे आत्महत्या होण्याची दाट भीती येथील सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

माहीम पश्चिम येथील फुटपाथवर किरकोळ विक्री करून गुजराण करणाऱ्या विक्रेत्यांना इथे पाऊल ठेऊ दिलं जात नाही. इथल्या दुकानदारांनी आणि रहिवाशांनी असं पक्क केल्याचेचं एका विक्रेत्याने सांगितले. दरम्यान शासनाने या गंभीर बनत चाललेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. यातून योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी धारावीत होत आहे.

due to huge corona cases many companies are not accepting people coming from dharavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.