डॉक्टरांना सोडा त्यांच्या नातेवाईकांना देखील उपचार मिळेना; हो,नाही मध्ये एकाने गमावला जीव

डॉक्टरांना सोडा त्यांच्या नातेवाईकांना देखील उपचार मिळेना; हो,नाही मध्ये एकाने गमावला जीव
Updated on

मुंबई: मुंबईत कोरोनाचं संकट थैमान घालत आहे. त्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची चिंता न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र यात काही खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना उपचार नाकारण्याच्या घटनाही सतत समोर येत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे एका डॉक्टरच्याच नातेवाईकाला खासगी रुग्णालयाकडून उपचार नाकारण्यात आले असल्याची बाब उघड झालीये. डोंबिवलीमध्ये एका खासगी रुग्णालयात  वैद्यकीय सेवा देणारे एक डॉक्टर घाटकोपरमध्ये राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासऱ्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांच्यावर ज्या डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत त्या डॉक्टरांकडे त्यांना नेण्यात आलं. परंतु या खासगी रुग्णालयानं रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी नकार दिला.

त्यांच्या सासऱ्यांना घाटकोपर परिसरातल्या ४-५ रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. मात्र कुठल्याही रुग्णालयानं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी होकार दिला किंवा त्यांना भरती करून घेतलं नाही. काही रुग्णालयांकडून तर या रुग्णाची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे का, अशी विचारणा करण्यात आली.

त्यांचे डोंबिवलीतले सहकारी त्यांची मदत करण्यासाठी तयार होते. त्या डॉक्टरच्या सहकाऱ्यांनी त्याच्या सासऱ्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना डोंबिवलीच्या रूग्णालयात दाखल करा असा सल्लाही दिला. त्यामुळे राहत्या ठिकाणीच वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना त्यांच्या डोंबिवलीच्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र जाताना त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं.

२०-२५ मिनिटं पोलिसांकडून विचारपूस करण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. रुग्णालयामध्ये त्यांनी सासऱ्यांना दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिक खालावली होती.  डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या सासऱ्यांची प्राणज्योत मालवली. योग्यवेळी मदत मिळाली असती तर या डॉक्टरच्या सासऱ्यांचे प्राण वाचले असते.

कुठल्याही खासगी रुग्णालयानं रुग्णांना सेवा नाकारू नये असं प्रशासनाकडून वारंवार संगणयत येतंय. मात्र घाटकोपरमधला हा प्रकार संतापजनक आहे. एका डॉक्टरच्या नातेवाईकांसोबत असं घडत असेल तर सामान्य नागरिकांनाही इथे उपचार उपलब्ध होत नसतील. यामुळे आता अशा रुग्णालयांवर काही कारवाई होणार का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.

due to increased corona threat doctors are not accepting relatives of doctors

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.