नवी मुंबई : ‘कोरोना’ विषाणूविषयीच्या गैरसमज आणि अफवांमुळे खवय्यांनी चिकन खाणे कमी केले आहे. त्यामुळे मांसाहारासाठी मटणाची मागणी वाढली आहे. परंतु अशातच, मुंबईत मटणाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. देवनार कत्तलखान्यातील ६० टक्के बकरे दक्षिणेतील व्यापारी खरेदी करून घेऊन जात असल्याने, महामुंबई क्षेत्रात; तसेच राज्यातही बकऱ्यांची टंचाई जाणवू लागली आहे.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच सातारा, सांगली, जळगाव येथील आठवडी बाजारात विकलेले ३० ते ३५ हजार मेंढे, बकरे देवनारच्या बाजारात आणले जातात. दर मंगळवारी व शनिवारी येथे बकऱ्यांचा बाजार भरतो. त्यातील ९० टक्के बकरे राजस्थान, गुजरातमधून विक्रीसाठी येतात. देवनारमध्ये खरेदी-विक्री ही वजनावर होत असून किलोमागे साधारणतः ५०० रुपये दर आहे. दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत हा दर कमी असल्याने कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गोवा येथील व्यापारी देवनारमध्येच खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे जवळपास ६० टक्के बकरे राज्याबाहेर विक्रीसाठी जात आहेत.
देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्टे यांनी मात्र हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, राज्याबाहेरून व्यापारी खरेदीसाठी देवनारमध्ये येत आहेत, हे खरे असले तरी, ही खरेदी केवळ ५ ते ७ टक्के आहे. आपण नियमानुसार त्यांच्या खरेदीवर बंदी आणू शकत नाही. त्यांना येथे येण्यापासून अडवू शकत नाही.
ही बातमी वाचली का? कहर! साथीच्या आजारांचा नशेबाज असा उचलतात फायदा
व्यवस्थापनाकडून सांगितला जाणारा आकडा हा केवळ दाखवायचा आहे. प्रत्यक्षात येथे दक्षिणेकडील व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे पुरेसा माल असूनही किरकोळ विक्रेत्यांना तो मिळेनासा झाला आहे.
- सरफराज थानावाला, सदस्य, बॉम्बे मटण डीलर्स असोसिएशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.