चिंताजनक : मुंबईतील कांजूरमार्गमध्ये प्रशासनाने केल्या 20 चाळी सील

चिंताजनक : मुंबईतील कांजूरमार्गमध्ये प्रशासनाने केल्या 20 चाळी सील
Updated on

मुंबई : कांजूरमार्ग पूर्व येथील नेहरू नगरमधील अंबिका निवास चाळीत बुधवारी 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णावर पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी दिली. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ इथल्या 20 चाळींना सील करण्यात आलंय. 

कांजूरमार्ग पूर्व येथील नेहरू नगरमधील अंबिका निवास चाळीत 65 वर्षीय वयोवृध्द एकटेच राहतात. त्यांना खानपान देण्यासाठी त्यांचा सहकारी व देखरेखीसाठी मेहुणे त्यांच्या संपर्कात होते. त्यांना 20 मार्चपासून सर्दी, खोकला, ताप येत होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

महत्त्वाच्या बातम्या : 

डॉक्‍टरांनी त्यांची कोरोनाची तपासणी केली असता, ते पॉझेटिव्ह आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील दोन्ही सहकाऱ्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. या घटनेनंतर अंबिका निवास चाळीच्या आजूबाजूच्या सुमारे 20 चाळींना सील लावण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर कांजूरमार्ग परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी सुरूच आहे. तसेच नागरिकांनी गर्दी करू नका, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. कांजूरमार्गमध्ये आढळलेला रुग्ण कुठेही बाहेर गेलेला नाही. तरीही त्यांची कोरोनाची तपासणी पॉझेटिव्ह आल्याने करंजे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

due to novel corona virus covid 19 crisis 20 chawls in mumnai kanjurmarg sealed 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.