Victory Parade: विश्वविजेत्या खेळाडूंना जवळून डोळे भरुन पाहण्यासाठी तो चक्क उंच झाडावर बसला जाऊन; व्हिडिओ व्हायरल

टीट्वेंटी वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा आज मुंबईत ग्रँड स्वागत सोहळा पार पडला. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी रॅली काढण्यात आली होती.
T20 World Cup
T20 World Cup

मुंबई : T20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा आज मुंबईत ग्रँड स्वागत सोहळा पार पडला. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी रॅली काढण्यात आली होती. यावेळी नरिमन पॉईंट भागात तुफान गर्दी झाली होती. तेवढीच गर्दी वानखेडे स्टेडियममध्ये बसली होती. पण यात कहर म्हणजे भारतीय टीमच्या एक चाहता खेळाडूंना जवळून पाहता यावं यासाठी चक्क झाडावरील एका उंच फांदीवर जाऊन बसला. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. (During the victory parade of Team India on Marine Drive in Mumbai fan was seen climbing tree branch to get better view)

व्हिडिओत एक तरुण मरिन ड्राईव्ह परिसरातील एका मोठ्या झाडाच्या उंच फांदीवर जाऊन बसला होता. विशेष म्हणजे या फांदीजवळूनच दुमजली ओपन बस ही जात होती. त्यामुळं अगदी जवळून या तरुणाला खेळाडूंना पाहता येत होतं. पण खेळाडूंवर रोखलेल्या कॅमेरॅमध्ये या तरुणाच्या हालचाली देखील टिपल्या गेल्या. खेळाडूंची केवळ एक झलक पाहण्यासाठी हे वेड धाडसच या ठिकाणी या तरुणानं केलं होतं. पण यामुळं त्याला गंभीररित्या दुखापतही होण्याची शक्यता होती.

दरम्यान, इतरही काही छोट्या झाडांवर जाऊन बसण्याचा प्रकार चाहत्यांनी केल्याचे व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसंच नरिमन पॉईंट इथं खेळाडूंच्या रॅली मार्गावर भारतीय टीमच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यापूर्वीच्या २००७ मधील वर्ल्डकपवेळी निघालेल्या रॅलीचा विक्रमच या गर्दीनं मोडला. सुमारे तीन लाख लोक रस्त्यावर असतील असं सांगितल जात होतं.

T20 World Cup
Water Salute: टीम इंडियाच्या विमानाला 'वॉटर सॅल्युट'; मुंबई विमानतळावरील दृश्य पाहून व्हालं थक्क

तत्पूर्वी वानखेडे स्टेडियम इथं होणाऱ्या बक्षीस वाटप कार्यक्रमासाठी खच्चून गर्दी झाली होती. ३५ हजार आसनक्षमतेचं हे स्टेडियम अवघ्या काही मिनिटांतच पूर्णपणे भरुन गेलं, स्टेडियम भरल्यानंतर प्रवेशद्वारं बंद करुन घेण्यात आली. दरम्यान, एका ठिकाणी काहीसा चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. पण यात कोणीही जखमी झालेलं नाही, अशा प्रकारे टीम इंडियाचं स्वागत चाहत्यांनी जोरदार केलेलं पाहायला मिळालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com