Earth : पृथ्वीने महाविस्फोटक तापमानात केला प्रवेश
वसई - काही वर्षांपूर्वी पृथ्वीचे सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस होते. १७५६ पासून दोन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. यात औद्योगिक क्रांतीही कारणीभूत आहे; मात्र ऑगस्ट २०१६ पासून पृथ्वीचे सरासरी तापमान ०.२० ने दरवर्षी वाढत आहे. दोन अंश सेल्सिअसची वाढ रोखण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये पॅरिस करार झाला. जगातील १९६ राष्ट्रांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक करार मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यासाठी केला, मात्र तो अयशस्वी ठरत आहे.
दर पाच वर्षांनी सरासरी एक अंशाची वाढ ही पृथ्वीच्या इतिहासात कधीही झाली नसावी. आपण एका महाविस्फोटक तापमानात प्रवेश केला आहे. आज विकासाच्या नावाखाली मानव या पृथ्वीचाच शोषक बनला आहे, अशी खंत पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊत यांनी व्यक्त केली.
नंदाखाल येथील संत जोसेफ शिक्षण संकुल व निर्भय जनमंच आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तापमान व हवामान बदल या विषयावर प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात या परिस्थितीवर काही उपायदेखील सुचवले व पृथ्वीवरील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, औद्योगिकीकरणाची प्रक्रिया, तसेच जंगलतोड थांबवली पाहिजे असा सल्ला दिला. निर्भय जनमंचचे कार्यकर्ते जॉन परेरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फादर ज्यो आल्मेडा व फादर प्रदीप डाबरे यांनी विशेष प्रयत्न केले.
तापमानात मोठी वाढ होण्याची भीती
कार्बन डाय-ऑक्साईड हा वायू हवेपेक्षा जड असल्यामुळे तो वातावरणात साचून राहतो. सध्या हरित द्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया थांबली आहे. तापत जाणारे चक्र वाढत चालले आहे. आज तापमान ३५ अंश सेल्सिअस असेल, तर २०२६ पर्यंत त्या त्या भूभागाप्रमाणे तापमान हे ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल, अशीही माहिती प्रणाली राऊत यांनी दिली.
एका विद्यार्थ्यामुळे कुटुंब जागृत
सेंट जोसेफ संस्थेचे मॅनेजर फादर थॉमस डिसोजा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की आजचा हा कार्यक्रम हवामान, तापमानाबाबत जडणघडणीचा होता. यातून पाचशे विद्यार्थी जरी जागृत झाले, तरी पाचशे कुटुंबे जागृत होतील व पुढच्या पिढीला याचा फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.