Water Shortage Vasai : वसईच्या पूर्व पट्टीत भीषण पाणी टंचाई; ७० हजार नागरिकांना होतोय पाच टँकरनी पाणी पुरवठा

आज या ठिकाणच्या जवळपास ७० हजार नागरिकांना पालिकेच्या ५ टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
eastern part of Vasai faces severe water shortage  water supplied to 70 thousand citizens by five tankers
eastern part of Vasai faces severe water shortage water supplied to 70 thousand citizens by five tankers
Updated on

विरार : वसईच्या पूर्वपट्टीतील काही गावांना आजही नदीच्या खड्डयांतून पाँइगोला करून आपली तहान भागवावी लागत आहे. य गावासाठी ६९ गावाची पाणी पुरवठा योजना १५ वर्षा पूर्वी मंजूर झाली असून, पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु त्यात पाणी नसल्याने आज या ठिकाणच्या जवळपास ७० हजार नागरिकांना पालिकेच्या ५ टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.

मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातील कोल्ही, चिंचोटी, देवदल, कामण सागपाडा आणि खिंडीपाडा येथील नागरिकांना बोअरवेल आटल्याने पालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या गावांची लोकसंख्या साधारण पणे ७० हजारच्या आसपास आहे. त्यातच या भागात मोठ्या प्रमाणात छोटे छोटे कारखाने असल्याने त्यांची पाण्याची टंचाई जाणवत आहे.

येथील गावामध्ये १०० च्यावर बोअरवेल असून त्यांनी तळ गाठल्याने ते बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. या भागात कामाण नदी असून त्या नदीचे पाणी व्यवस्थित पणे अडविले जात नसल्याने ते एका बाजूला वाया जात आहे. तर दुसऱ्या बाजूला तबेल्यामुळे ही नदीही दूषित झाली आहे.

येथील नागरिक पाण्यासाठी महापालिका अस्तित्वात आल्यापासून संघर्ष करत आले आहेत त्यांच्या या संघर्षाला अजून पर्यंत यश काही आले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील दोन पाणी पुरवठा योजना ही बंद पडल्या आहेत. त्यामुळे मार्च पासूनच येथील नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे.

eastern part of Vasai faces severe water shortage  water supplied to 70 thousand citizens by five tankers
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार! ससूनच्या दोन मोठ्या डॉक्टरांना अटक

६९ गावांच्या पाणी पुरवठा योजने या गावाचा समावेश असून, त्या अंतर्गत याठिकाणी उंच पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु पाणी येत नसल्याने त्याही पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी येथी नगरसेविका आणि नागरिक पाठपुरावा करत असून यावेळी मात्र त्यांच्या पाठपुराव्याला यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संधर्भात येथील नागरिकांनी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची वस्तुस्थिती सांगितल्यावर क्षितिज ठाकूर यांनी पालिका अधिकर्त्यांशी बोलून तातडीने उद्या (मंगळवार) एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी पुरवठ्यातून पाणी मिळते कि, सूर्याचे पाणी तातडीने देण्यात येते याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागात विचारले असता पूर्वपट्टीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यातले.

eastern part of Vasai faces severe water shortage  water supplied to 70 thousand citizens by five tankers
Pune Night Life : बाहेरून बंद अन् आतून सुरू, पुणे अपघातानंतर बालेवाडी हायस्ट्रीटवरील पब आणि बार सुधारले नाहीत?

आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत आहोत. याभागात वाढती लोक्संख्या आणि कमी पाणी पुरवठा असे समीकरण झाले आहे. येथील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. काही ठिकाणी क्षार युक्त पाणी मिळत असल्याने त्याचा आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे. पालिका याभागात दिवसाला ५ टँकर पाठवते. पण ते टँकर एवढ्या मोठ्या लोक्संखेला कसे पुरणार त्यातच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने तेथील वाहनांची वाहतूक कामण भिवंडी मार्गावरून वळल्याने याभात टँकरला येण्यास जागा मिळत नाही. आमदार क्षितिज ठाकूर यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आता तरी आमची पाण्याची तहान भागेल असे वाटते.

दिनेश म्हात्रे, माजी सरपंच , कामण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()