खरंच नियमित पान खाल्ल्याने 'ती'  पावर वाढते का ?

खरंच नियमित पान खाल्ल्याने 'ती'  पावर वाढते का ?
Updated on

मुंबई: पान म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते हिरवंगार पानात असलेली मुखवासाची सामग्री आणि त्यामध्ये असलेला गुलकंद. पान म्हणजे लहान मुलांची आणि वृद्ध व्यक्तींची आवडती गोष्ट. जेवण झाल्यानंतर अनेक लोकं पण खातात. मात्र हेच पान खाल्यामुळे तुम्ही तुमची सेक्स लाईफ चांगली ठेऊ शकता आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेऊ शकता.

साधारणपणे आपण पान जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी किंवा आपली पचनक्रिया चांगली राहण्यासाठी खात असतो. मात्र हे पान  खाण्यामुळे आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला पान खाण्याचे असेच काही फायदे सांगणार आहोत. 

पचनक्रिया ठेवतं उत्तम: 

पान खाल्यामुळे पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी मदत होते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बहुतांश लोकं पान खाताना त्यामध्ये तंबाखू किंवा इतर हानिकारक पदार्थ मिसळतात. हे पान खाण्यासाठी अतिशय घातक असतं. मात्र पान खाताना साधं गुलकंद घातलेलं पान खाणं फायद्याचं ठरतं. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी फक्त पानच नाही तर त्यामध्ये असलेली बडीशेप, विलायची, गुलकंद,ओवा आणि इतर पदार्थही मदत करतात.   

पान खाल्ल्यामुळे येतो उत्साह:

पान  खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि ईपिनोफ्राईन या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. हे डोपामाईन आपल्या शरीरात उत्साह निर्माण करण्याचं काम करतं तर ईपिनोफ्राईन आपल्या मेंदूला शांत ठेवण्याचं काम करतं. त्यामुळेच आपल्याला पान खाल्यानंतर उत्साही वाटतं. 

शरीरात वाढतं लिबिडोचं प्रमाण: 

पान खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आपल्या शरीरात शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा जागृत होते. तसंच यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होतं जे तुमची सेक्स लाईफ चांगली ठेवण्यात तुम्हाला मदत करत असतं. तुमच्या लैंगिक भागात ब्लड फ्लो झाल्यामुळे तुमची सेक्स लाईफ चांगली राहण्यात मदत होते. 

घशाच्या समस्या होतात दूर:

पानात असलेल्या गुलकंद, विलायची आणि लवंग या पदार्थांमुळे तुमच्या घश्याला होणारी खवखव दूर होते. तसंच घसा दुखणे आणि जळजळ होणे यापासूनही आराम मिळतो. पण खाल्ल्यामुळे आपल्या अंगातला थकवा निघून आपल्याला नवा उत्साह येतो. नियमित पण खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रासही दूर होतो. 

त्यामुळे नियमित पण खाऊन तुम्ही अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.

eating paan keeps you fresh and it also increases your that special power

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.