व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ

व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ
Updated on


नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारने अनिवार्य केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील आर्थिक घटकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने अनलॉक केल्यानंतरही महापालिकांच्या आडमुठे धोरणांमुळे टाळेबंदी सुरू राहील्याचाही फटका किरकोळ व्यावसायांना बसला आहे. नवी मुंबईत 1 ऑगस्टपासून टाळेबंदी हटवून अनलॉक सुरू केला आहे. मात्र महापालिकेने वेळेचे आणि एकदिवासाड दूकाने सुरू ठेवण्याची बंधने घातल्यामुळे व्यापाराला सुर गवसलेला नसल्याने व्यावसायिकांमध्ये महापालिकेविरोधात नाराजी आहे.  

मुंबई पाठोपाठ नवी मुंबई शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले आहे. मार्च महिन्यांपासून आत्तापर्यंत शहरात तब्बल 17 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होऊन गेली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता आयुक्त अभिजीत बांगर यांनी राज्य सरकारने टाळेबंदी मागे घेतल्यानंतरही 19 जुलैपासून सुरूच ठेवली होती. आठवड्यांच्या मुदतीनंतर पुन्हा ती वाढवण्यातही आली होती. अखेर 31 जुलैला ही टाळेबंदी संपल्यानंतर 1 ऑगस्टपासून फक्त कन्टेन्मेंट झोनपुरतीच टाळेबंदी सुरू ठेवण्यात आली. परंतू कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात व्यावसायिकांना दूकाने खुली करण्यासाठी नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच दूकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच एक दिवसाआड दूकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील व्यवसायिकांच्या धंद्यात तेजी आलेली नाही.

बेलापूर, नेरूळ, सिवूड्स, सानपाडा, वाशी सेक्टर 9, एपीएमसी मार्केट, तुर्भे जनता मार्केट या मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दहा दिवसांवर गणेश चतूर्थी येऊन ठेपली आहे. गणेश आगमनाला अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही दूकानांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत नाही. गणेश सजावटीसाठी एपीएमसी आणि तुर्भेतील जनता मार्केटला ग्राहकांची पसंती असते. मात्र ते मार्केट सुद्धा ग्राहकांवीना सुनेसुने झाले आहेत. 

15 ऑगस्टला आंदोलन करणार 
नवी मुंबई महापालिकेने दूकानदारांवर जाचक अटी लादू नयेत याकरीता आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेऊन मागण्या मांडल्या आहेत. दूकाने नियमित सुरू करणे आणि वेळे संध्याकाळी 9 पर्यंत वाढवून द्यावी, मालमत्ता कर माफ करावा अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. मात्र आमच्या मागण्यांकडे महापालिका लक्ष देत नाही, 15 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास स्वातंत्र्य दिनी आमच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा नवी मुंबई व्यापारी महासंघाचे महासचिव प्रमोद जोशी यांनी दिला आहे. 

अनलॉक सुरू झाल्यापासून ग्राहक येत नाही. वेळेचे बंधन आणि एकदिवसाआड खुले करण्याची निर्बंध असल्यामुळे ग्राहक येत नाही. ग्राहकांच्या मनात अजूनही कोरोनाची भीती आहे. तसेच सोशल डिस्टसिंगवर अधिक लक्ष द्यावे लागत असल्यामुळे ग्राहक दूकानांच्या बाहेर थांबावे लागते, पण ज्या ग्राहकांना घाई असते, ते लोक निघून जातात. 20 टक्के व्यावसाय होत आहे. 
ईश्वर सिंग  
कॉस्मेटीक, फॉर्मिंग ज्वेलरी, जनता बाजार

15 टक्के ग्राहक दूकानात येत नाहीत. पाऊसाचे चप्पल खरेदी करण्याचे हंगाम होते. नेमके त्याचवेळी टाळेबंदी सुरू असल्याने व्यावसायाचा मुख्य हंगाम बूडाला आहे. अशा परिस्थितीत एक दिवासाआड दूकान बंद सुरू करावे लागत असल्याने व्यावसायाला हवा तसा वेग मिळत नाही.
वेलजी पटेल,
फूटवेअर, वाशी सेक्टर 9

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.