शिवसेनेच्या संजय राऊतांना भाजपच्या दरेकरांचे सणसणीत प्रत्युत्तर

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाई प्रकरणावरून लगावला टोला
sanjay raut and pravin darekar
sanjay raut and pravin darekarsakal
Updated on

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी केलेल्या 100 कोटींच्या खंडणी वसुली आरोपांप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former home minister Anil Deshmukh ) गोत्यात सापडले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. आज सकाळी ईडीने त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर राजकीय वातारण तापलं असून देशमुखांच्या अटकेच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP sanjay raut) यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.(ED does job Autonomously not an intention of any kind of revenge behind this case)

"ईडीकडून देशमुखांवर होत असलेली कारवाई कोणाच्याही आशीवार्दाने किंवा सूडभावनेतून केली जात नाही. ईडी स्वायत्त तपास यंत्रणा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचा भाग म्हणून ही कारवाई होत आहे", असे दरेकरांनी उत्तर दिले. खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईतून राज्यात भाजपचं सरकार येईल, असं वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला.

sanjay raut and pravin darekar
अनिल देशमुखांना अटक होणार? 'ईडी'चे मुंबईच्या घरातही छापे

प्रविण दरेकर म्हणाले, "केंद्र सरकार आणि या कारवाईचा संबंध लावणे चुकीचं आहे. कुठल्याही तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात. त्यामुळे अशाप्रकारचं राजकरण केलं जात असून संबंधित विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची कारवाई आधीच सुरु आहे. या प्रकरणी ईडीने छापेही टाकले होते. तपास यंत्रणेचा भाग म्हणून ईडीकडून पुन्हा छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या काळात अशा प्रकारच्या अनेक कारवाया झाल्या आहेत. छापे टाकले गेलेत. सरकारने काही उद्देशाने या कारवाया केल्या होत्या असा संबंध लावणे उचित नाही. कारवाई होत असताना जर काही चुकीचं वाटत असेल तर त्यासाठी न्यायव्यवस्था आहे. मला विश्वास आहे की अशा प्रकारचं चुकीचं काम तपास यंत्रणा करणार ऩाही."

"कोणत्याही प्रकरणात तथ्य असल्याशिवाय तपास यंत्रणेकडून कारवाई होत नसते. त्यामुळं कारवाईला सामोरं गेलं पाहिजे. खासदार संजय राऊत सांगतात की ईडीच्या कारवाईतून राज्यात भाजपचं सरकार येईल. राम मंदिर घोटाळ्याची चौकशी करा अशीही मागणी ते करत आहेत. हे म्हणजे 'वड्याचं तेल वांग्यावर' काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही सूड भावनेने व कोणाच्याही आशीर्वादाने ही कारवाई होत नाही", असा पुनरूच्चार त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.