ED Raid in Mumbai : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर मुंबईत ईडीची धाड! कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी छापासत्र सुरू

Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal
Updated on

कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुरज चव्हाण या आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या मदतीने कोरोना काळात कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेले होते असा आरोप केला होता. दरम्यान आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी आज, २१ जून रोजी मुंबईत १५ ठिकाणी ईडीने ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित पाटकर घोटाळा प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता या प्रकरणात सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या निवसस्थानी ईडीची धाड पडल्याची माहिती मिळत आहे. संजीव जैस्वाल हे मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरीक्त आयुक्त होते.

Aditya Thackeray
PM Modi In US : अमेरिकेच्या खासदाराची PM मोदींवर जहरी टीका! भाषणावर टाकणार बहिष्कार

ईडीची ऐकूण १५ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. कोविड कथित घोटाळा प्रकरणातील फाइल्स ज्यांच्या मार्फत हाताळल्या गेल्या अशा महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संजीव जैस्वाल हे आधी ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेचे आतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक मिळाली. त्यानंतर ज्या संदर्भात ईडी चौकशी करत आहे त्या कॉन्ट्रॅक्टमधील एक भाग संजीव जैस्वाल यांच्याकडे होता.

Aditya Thackeray
Yoga Day 2023 : मोदींच्या 'योगा डे'चं लागलं देशाला वेड! श्वानाने देखील केले योगासन, Video Viral

त्यांच्या डिपार्टमेंटकडून ही फाइल हाताळली गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून नेमकं काय घडलं आणि कॉन्ट्रॅक्ट्स कसे आणि का देण्यात आले यासंबंधी ईडीकडून माहिती घेतली जात आहे. एकूण १५ ठिकाणी आज सकाळी ७ ते ८ दरम्यान ही छापेमारी करण्यात आली आहे.

Aditya Thackeray
Maharashtra Assembly Election : मुंबईवर राज्य कोणाचं? शिंदे गटाची हवा टाईट, ठाकरे गट जिंकणार 'इतक्या' जागा

आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या घरी चेंबूर, गोवंडी या ठिकाणी देखील छापे टाकण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. सुजीत पाटकर सोबतच इतर तात्कालीन मनपा अधिकारी तसेच आदित्य ठाकरे यांचे काही निकटवर्तीय यांच्या घरी छापेमारी केल्याचे बोलले जात आहे.

ईडीने १५ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केले आहेत . संध्याकाळपर्यंत ईडीकडून याबद्दल अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच ही छापेमारी का करण्यात आली हे स्पष्ट केलं जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.