Mumbai : शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना केले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक प्रशासनात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल एनआयईपीए संस्थेचा सन्मान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रदान
Mumbai NEWS
Mumbai NEWSesakal
Updated on

Mumbai : सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए), नवी दिल्ली या उच्चतम संस्थेद्वारा शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी, राजेश कंकाळ यांना आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय केंद्र येथील भीम सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी केंद्रिय शिक्षण सचिव, संजय कुमार, एनआयईपीएचे कुलपती महेशचंद्र पंत, उपकुलपती शशिकला वंजारी, कार्यक्रम संचालक कुमार सुरेश इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

Mumbai NEWS
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), अश्विनी भिडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तत्कालीन सहआयुक्त (शिक्षण), श्री. अजित कुंभार यांच्या प्रेरणेने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे व सर्वांगीण विकास साधणे, मोफत शिक्षणाची समान संधी उपलब्ध करणे, भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे, समाजाचा बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करणे ही उद्दिष्टे निश्चित करून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील पट संख्येत वाढ करणे हे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य - एक लक्ष ’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

Mumbai NEWS
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या आठ माध्यमाच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्या यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. नवीन प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी 'मिशन मेरिट' राबविण्यात येत असून अशा विविध उपक्रमांसाठी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांचा हा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी संघ भावनेतून दिलेल्या भरीव योगदानामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होत असल्याचे मनोगत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.