नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी-गणपतीनिमित्त आठ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत या सुट्ट्या असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना यासंदर्भात विनंती अर्ज केला होता. त्यानंतर पालिकेनं शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.