ओमिक्रॉनची संख्या वाढतीच; राज्यात नव्याने 8 रूग्णांची भर

दिवसागणिक ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
omicron
omicronSakal
Updated on

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रूग्णांची संख्या देशासह राज्यातदेखील वाढतानाच दिसत आहे. आज राज्यात नव्याने आठ (Eight New Omicron Cases Recorded In Maharashtra) ओमिक्रॉन बाधितांची भर पडली असून ओमिक्रॉन बाधितांचा राज्यातील आकडा आता 48 वर पोहोचला आहे. दिवसागणिक ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राजाच्या चिंतेत भर पडली आहे.

नव्याने नोंद करण्यात आलेल्या ओमिक्रॉनच्या आठ रूग्णांपैकी चार रूग्ण मुंबई, तीन सातारा, तर एक रूग्ण पुण्यातील आहे. राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid Cases Discharge) तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आज 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Coraona Death) राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.

omicron
"कोविशिल्डपेक्षा कोवोव्हॅक्स बेस्ट"; सरकारचा बूस्टर डोससाठी विचार

देशातील ओमिक्रॉनची संख्या 131 वर

दरम्यान दररोज वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या (Omicron Count go 131 In India ) रूग्णांमुळे देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 131 झाली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली असून, जगभरातील वाढती रूग्णसंख्या लेक्षात घेत अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. (Covid Protocol) भारतानेदेखील ओमिक्रॉनचा धोका असणाऱ्या देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना बंदी घातली असून, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट करण्याची सक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.