मुंबई : कोरानाची दुसरी (Corona Second Wave) लाट सुरू झाल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून बंद झालेल्या शाळा (Closed School) पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग हे कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Infection) लक्षात घेऊन सुरक्षितपणे ते सुरू केले जाणार असून त्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाने (School Education Section) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Eight to twelve school starts after long time Corona issue says School education ministry)
जी गावे. ग्रामपंचायती, शहरे हे कोवीड मुक्त क्षेत्रात येतात, त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार असून त्यासाठी मान्यताही देण्यात आली आहे. मागील वर्षी राज्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिवाय मुले घरी बसल्याने त्यांच्या मानसिक परिणाम होत आहेत, अनेक मुलांचे बालविवाह होणे, मुले बालमजुरीकडे वळणे असे प्रकार समोर आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पुढील काळात भरून काढणे शक्य होणार नाही, यासाठी शालेय शिक्षण विभागाने आठवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
चर्चा करून पालकांसोबत ठराव आवश्यक
वर्ग सुरू करताना त्या त्या गावातील पालकांसोबत चर्चा करून ठराव करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये मुलांना बोलावताना टप्प्या- टप्प्यात बोलवण्यात यावे, त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती ही बंधनकारक नसून ती पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल,
एका बाकावर एकच विद्यार्थी
दर दिवशी शाळा या दोन सत्रात भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, दोन बाकातील अंतर हे किमान ६ फूट असेल, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असतील. वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर करणे आवश्यक असेल. एखाद्या विद्यार्थ्यांला लक्षण असल्यास त्याला घरी पाठवून त्याची कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक असेल. प्रत्येक शाळांमध्ये हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, शाळेचे निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने करावे, शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास ते दुसरीकडे हलवावे, शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात भरवावी.
शिक्षकांनी त्याच गावात राहणे आवश्यक
शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतरांनी कोवीडच्या आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजन आदी चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांनी या काळात त्याच गावात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शिक्षकांची गावात राहण्याची सोय करावी, जर अशक्य झाल्यास शिक्षकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू न देण्यासाठी दक्षता घेतली जावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेच्या आवारात शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जावू नये अशाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध
शाळा परिसरात परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा आदी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर कुटुंबात लक्षण अथवा एखादा व्यक्ती आजारी असल्यास त्यांच्या मुलांना शाळेत पाठवू नये असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.